शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार राष्ट्रवादीत नाराज?; पत्रकार परिषदेत केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 12:38 IST

मला अधिवेशनात कुणी बोला अथवा नका बोला असं सांगितलं नव्हतं. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे असं अजित पवार म्हणाले.

मुंबई - दिल्लीत राष्ट्रवादीचं २ दिवसीय अधिवेशन पार पडलं. अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय नेत्यांनी पक्षाची धोरणे आणि कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं. राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेत्यांनी मार्गदर्शन केले. मी राष्ट्रीय पातळीवर जास्त भाष्य करत नाही. मला बोलण्याची संधी दिली परंतु वेळेअभावी बोलता आले नाही. केवळ मी नाही तर सुनिल तटकरे, वंदना चव्हाण आणि ५-६ जणांना भाषण करता आले नाही. शरद पवारांचे ३ वाजता समारोपाचं भाषण सुरू होणार होते. नाराजीच्या बातम्यांना काहीही अर्थ नाही अस सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजीच्या बातमीवर खुलासा केला आहे. 

अजित पवार म्हणाले की, पक्षाने मला उपमुख्यमंत्रिपद दिले, विरोधी पक्षनेतेपद दिले. मी नाराज कशाला होऊ? राष्ट्रवादीने मला कधी डावललं नाही. मला अधिवेशनात कुणी बोला अथवा नका बोला असं सांगितलं नव्हतं. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. वस्तूस्थिती आधारित बातमी देण्याची जबाबदारी माध्यमांसमोर आहे. मी २१ वर्षात राष्ट्रीय पातळीवर जातो परंतु कुठे भाष्य करत नाही. राज्यात अधिवेशन असलं, कार्यक्रम असलं तर मी भाषण करतो. तुमचे गैरसमज दूर करून राज्यासमोरील प्रश्नाबाबत भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे असं त्यांनी म्हटलं. 

लम्पी आजारावर सरकारनं भूमिका मांडावीराज्यात जनावारांमध्ये लम्पी स्किन फैलावत आहे. जनावरं दगावली तर त्याचा शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायावर परिणाम होणार आहे. मार्च २०२० मध्ये गडचिरोली हा आजार पहिल्यांदा आला. आता राज्यात अनेक भागात रोग पसरतोय. यावर राज्य सरकारनं काय उपाययोजना केल्यात आणि लोकांमधील संभ्रमावस्था दूर करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.  १६ तारखेला मुख्यमंत्र्यांनी साखर कारखाने सुरू करण्याबाबत बैठक आयोजित केली. कारखान्यावर मोठ्या प्रमाणात बैल वाहतुकीने ऊस आणला जातो. बैलावर लम्पी आजार फोफावला तर त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. सरकारने या संकटाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं. लोकांमध्ये जागरुकता आणली पाहिजे. खबरदारी काय घ्यायची याचं पत्रक काढावं असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त जनावरांचे लसीकरण झाले पाहिजे. त्यात बैल, गाय आणि ४ वर्षावरील खोंडांचं लसीकरण झाले पाहिजे. केंद्राकडून लस कमी प्रमाणात येत असेल तर परदेशातून लस मागवा परंतु शेतकऱ्यांच्या जनावरांना संकटातून बाहेर काढलं पाहिजे अशीही मागणी अजित पवारांनी केली. 

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी गर्दी जमवावी लागणं हे दुर्देवतसेच औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी करण्यासाठी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांना हजर राहण्याबाबत पत्रक काढून आदेश देण्यात आले. महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडतंय. अंगणवाडी सेविकांना सभेला बोलावलं तर मुलांकडे लक्ष कोण देणार? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांला गर्दी जमवण्यासाठी अशाप्रकारे आदेश काढले जात असतील तर हे दुर्देव आहे. आता सत्ताधारी म्हणतील परस्पर हे पत्रक काढलं गेले. परंतु आम्हीही सरकारमध्ये होतो असं परस्पर कुणी पत्रक काढत नाही असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला. 

२ महिने जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीराज्यात नवं सरकार आल्यानंतर कॅबिनेट विस्तार करायला विलंब केला. त्यानंतर आता जिल्ह्यांना अद्याप पालकमंत्री नेमले नाहीत. आमदारांमध्ये नाराजी वाढेल यासाठी मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार पुढे ढकलला जात आहे. जिल्ह्यात येणाऱ्या संकटाकडे लक्ष द्यायचं कुणी? १६ जिल्ह्यात झेंडावंदन करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना नेमावं लागलं. सरकारच्या या कारभाराचा मी धिक्कार करतो असं सांगत अजित पवारांनी घणाघात केला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस