शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:41 IST

पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना युटर्न घेतला आहे.

Ajit Pawar on Parth Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित जमीन खरेदी व्यवहारामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पुणे परिसरातील महार वतनाच्या ४० एकर जमिनीच्या व्यवहारात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आणि आर्थिक अफरातफर केल्याचा थेट आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर या प्रकरणावरून थेट अजित पवारांना लक्ष्य केले आहे. १८०० कोटींच्या जमिनीचा व्यवहार केवळ ३०० कोटींमध्ये करून, नियमानुसार आवश्यक असलेली सुमारे २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी केवळ ५०० रुपये भरून चुकवली गेल्याचा हा गंभीर प्रकार आहे. या घोटाळ्याची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देऊन पुन्हा युटर्न घेतला आहे.

आता या प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाची आपल्याला कल्पना नव्हती असा दावा केला आहे. मात्र आदल्याच दिवशी अजित पवार यांनी तीन ते चार महिन्यांपूर्वी अशा पद्धतीचं काहीतरी सुरु असल्याचं माझ्या कानावर आलं होतं असं सांगितले होते. त्यामुळे आता अजित पवार यांनी युटर्न घेतल्याचे म्हटलं जात आहे. झी २४ तास सोबत बोलताना अजित पवार यांनी या प्रकरणात पार्थ पवार किंवा इतर कोणाशीही बोलणं झालेलं नसल्याचे म्हटलं.

"माझा या गोष्टीशी दुरान्वये संबंध नाही हे मी कालच सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमुळे आज सकाळापासून आमच्या आढावा बैठका आहेत ज्या ६ ते ७ वाजेपर्यंत सुरु असतील. त्यानंतर मी सांगणार आहे. इतर सर्व गोष्टी नियमाप्रमाणे करण्यास सांगितल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. चौकशी होत असून त्यातून सत्य बाहेर येईल. सत्य समोर आल्यानंतर कारवाईसंदर्भात निर्णय घेतला जाईल," असे अजित पवार म्हणाले.

यावेळी तुम्हाला याची कल्पना होती का? असं विचारण्यात आलं. यावर अजित पवार यांनी नकार दिला. "नाही, अजिबात नाही. मी नेहमी माझ्या सगळ्या लोकांना सांगतो की कोणतीही गोष्ट करताना कायद्याच्या, नियमाच्या, संविधानाच्या चौकटीत राहूनच करा. या प्रकरणात माझं कुणाशीही बोलणं झालेलं नाही," असंही अजित पवारांनी म्हटलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar U-Turn: Denies Knowledge After Saying He Heard Rumors

Web Summary : Ajit Pawar denies knowing about Parth Pawar's land deal after earlier hinting at awareness. An investigation is underway into the alleged land scam involving undervalued property and unpaid stamp duty, following accusations by opposition leaders.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारparth pawarपार्थ पवार