शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या नजरेत नजर न मिळवताच निघालो; अजित पवारांनी सांगितला भेटीचा तपशील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 18:05 IST

अजित पवार यांची आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मनधरणी केली. सुमारे तासभर बैठक सुरु होती.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राजीनाम्यावरून त्यांची भुमिका आज पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी त्यांनी आजच्या शरद पवार यांच्या भेटीवेळचीही माहिती दिली. 

अजित पवार यांची आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मनधरणी केली. सुमारे तासभर बैठक सुरु होती. यानंतर अजित पवारांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले. मात्र, आचारसंहितेमुळे त्यांनी स्थळ बदलत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली. 

आजची पत्रकार परिषद ही शरद पवारांच्याच सांगण्यावरून घेत असल्याचे अजितदादा म्हणाले. शरद पवारांना भेटून त्यांच्यासमोर बाजू मांडली. पुण्यात जाणार होतो पण पवारच मुंबईत असल्याने मी घरी भेट घेतली आणि सविस्तर माहिती दिल्याचे अजितदादांनी सांगितले. 

यानंतर पवारांनी काय सांगितले या प्रश्नावर त्यांनी पत्रकार परिषद घेण्यास सांगितल्याचे अजितदादा म्हणाले. तुम्ही राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत, याबद्दल पत्रकार परिषद घ्या, असे पवारांनी सांगितले. यानंतर पवारांनी मी तुमचे ऐकून घेतले, यापुढे मी सांगेन ते ऐकायचे आणि तसेच वागायचे, असे म्हटले. पवारांच्या या बोलण्यावर मी त्यांच्याशी नजरही मिळविली नाही आणि मान खाली घालून निघून आलो, असे अजित पवार यांनी सांगितले. 

शब्द आमच्यासाठी अंतिम शरद पवार यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो, विशेष म्हणजे कुटुंबातील कलहाबाबत बोलताना अजित पवारांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करताना अजित पवारांनी यापूर्वीही 72 हजार कोटींचा घोटाळा असं म्हटलं. तर, आताही 25 हजार कोटींचा घोटाळा काढलाय, म्हणजे तुम्हालाही वाटेल ह्या अजित पवारला काही हजार कोटींशिवाय जमतच नाही का?. अहो, मीही तुमच्यासारखा माणूसचं आहे, मलाही भावना आहेत, असं म्हणता अजित पवारांमधील भावनिक माणूस महाराष्ट्राला पाहायला मिळाला. अजित पवारांच्या डोळ्यात पाणी तरळले, तसेच या घोटाळ्याशी माझा संबंध नसून जाणीवपूर्वक मला टार्गेट केलं जातंय, असेही अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस