शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार मनसे प्रमुख राज ठाकरेंशी बोलणार; रात्रीपर्यंत चर्चा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 18:58 IST

आमच्या सगळ्यांचे एकमत झाले तर राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेईन असं अजित पवार म्हणाले.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या पक्षाचे नव्हते. ते सगळ्यांचे होते. भेदभाव करण्याचं कारण नाही. हर हर महादेव सिनेमात जे दृश्य दाखवलं त्याबाबत रात्री उशिरापर्यंत मी मनसे प्रमुख राज ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचीही भेट घेणार असल्याचं अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

अजित पवार म्हणाले की, हर हर महादेव सिनेमात ज्या काही गोष्टी दाखवल्या आहेत त्याबाबत मी राज ठाकरेंशी बोलून त्यांच्या अख्यारित काही असेल. त्यांना पटत असेल त्यांनी हस्तक्षेप करावा. हा पक्ष तो पक्ष असा भेदभाव करण्याचं कारण नाही. मी सिनेमा पाहिलाय, पण माझ्यापेक्षा ज्यांना इतिहासाचं ज्ञान आहे अशांना घेऊन सिनेमा पाहेन. आमच्या सगळ्यांचे एकमत झाले तर राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेईन. इतिहासातील घटनांची तोडमोड करून दाखवण्याचा वेगळा प्रयत्न चाललाय हा भूषणाह नाही. महाराष्ट्राला परवडणारं नाही असं मी नक्की सांगेन अशी माहिती अजितदादांनी दिली. 

हर हर महादेव सिनेमावरून वादंगहर हर महादेव या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखवली आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल येथील शो बंद पडला होता. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले, तसेच कोण जितेंद्र आव्हाड असा सवाल केल्याने, संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केली होती. यानंतर मंगळवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आव्हाडांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती. 

या चित्रपटात राज ठाकरेंचा आवाज वापरण्यात आला आहे. त्यात चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप- प्रत्यारोपाची मालिका सुरू झाली. त्यानंतर हर हर महादेव' या चित्रपटावर कोणीही भाष्य करू नये, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या प्रवक्त्यांना दिल्या. या प्रकरणाला राष्ट्रवादी काँग्रेस जातीय रंग देत असून सध्या या विषयावर बोलू नये, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या असल्याची माहिती समोर आली होती.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRaj Thackerayराज ठाकरेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड