शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा; शेरोशायरी ऐकवत अजित पवारांचे विरोधकांना चिमटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 07:09 IST

‘सितम करोगे, सितम करेंगे, करम करोगे करम करेंगे हम आदमी है तुम्हारे जैसे जो तुम करोगे वह हम करेंगे’ या  मंझर भोपालींच्या गझलेतील ओळी ऐकवत अजित पवार यांनी विरोधकांच्या फेक नरेटिव्हला आता सडेतोड उत्तर दिले जाईल, असे बजावले. 

मुंबई - जे आम्ही केले त्याचे कौतुक करा, नाही नाही नाही यापेक्षा होय होय होय म्हणायला शिका. उगाच फेक नरेटिव्ह पसरवू नका असे म्हणत आणि ‘श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा’ या कविवर्य विंदा करंदीकर यांच्या कवितेतील ओळी वाचून दाखवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना शुक्रवारी विधानसभेत भरपूर चिमटे काढले. 

‘ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी, ती न कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा’ ही याच कवितेतील ओळ अजित पवार यांनी शरद पवारांच्या नेतृत्वातील जयंत पाटील आणि इतरांना काढल्याची कुजबुजही या निमित्ताने झाली. ‘जिन पत्थरों को हमने अता की थी धडकने, वह बोलने लगे तो हम पे बरसने लगे’ हा शेर ऐकवत त्यांनी आपण मोठी केलेली माणसे आज आपल्यावरच टीका करतात, अशी खंत त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे पाहत ऐकविला.  ‘सितम करोगे, सितम करेंगे, करम करोगे करम करेंगे हम आदमी है तुम्हारे जैसे जो तुम करोगे वह हम करेंगे’ या  मंझर भोपालींच्या गझलेतील ओळी ऐकवत अजित पवार यांनी विरोधकांच्या फेक नरेटिव्हला आता सडेतोड उत्तर दिले जाईल, असे बजावले. 

‘बॉम्बे टू गोवा’ सिनेमा काढावा लागेलमुंबई-गोवा महामार्गाचे बांधकाम रखडल्याचे मान्य करत अजित पवार म्हणाले, की अनेकांनी हा मार्ग आम्ही करूनच दाखवणार असे म्हणत फोटो काढले. खोटी आश्वासने दिली. आमदारकी, खासदारकी मिळविली. खरे तर या रखडपट्टीवर ‘बॉम्बे टू गोवा’ असा सिनेमाच काढायला हवा, पण आता नितीन गडकरी तिसऱ्यांदा भूपृष्ठ वाहतूक खात्याचे मंत्री झाले आहेत आणि हा मार्ग पूर्ण करणारच, असे त्यांनी सांगितले.

अर्थसंकल्प फुटला नाहीजनभावना लक्षात घेऊन अर्थसंकल्पात काय असावे, या विषयीचा अंदाज बांधणाऱ्या बातम्या माध्यमे देत असतात. मी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी अशा काही बातम्या आल्या असल्या तरी अर्थसंकल्प फुटला असा त्याचा अर्थ होत नाही’ असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. अर्थसंकल्प मांडण्याच्या दिवशीच सकाळी वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यांवरून काँग्रेसचे नाना पटोले, शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप केला होता. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभा