कार्यक्रमात नेत्यांचा अनादर होऊ नये - अजित पवार

By Admin | Updated: August 26, 2014 17:50 IST2014-08-26T17:33:28+5:302014-08-26T17:50:40+5:30

एखाद्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित मान्यवर नेत्यांचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे, त्यांचा अनादर होऊ नये असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लगावला.

Ajit Pawar should not be disrespected in the program - Ajit Pawar | कार्यक्रमात नेत्यांचा अनादर होऊ नये - अजित पवार

कार्यक्रमात नेत्यांचा अनादर होऊ नये - अजित पवार

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २६ -  एखाद्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित मान्यवर नेत्यांचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे, त्यांचा अनादर होऊ नये असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला. मेट्रो- ३ प्रकल्पाच्या भूमीपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडूही उपस्थित होते. 
झारखंड आणि हरयाणा राज्यांतील प्रकल्पांच्या उदघाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असताना, उपस्थितांनी काँग्रेस मुख्यमंत्र्यांविरोधात उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करून गोंधळ घातला होता. नागपूरमधील मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर भाजपने कडाडून टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवारांनी आज भाजपाला टोला लगावला. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कोणत्याही नेत्याचा अनादर होऊ नये याची जबाबदारी उपस्थितांनी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
कुलाबा ते अंधेरी (सीप्झ) या भूयारी मार्गावरील नियोजित मेट्रो-३ चे आज भूमीपूजन करण्यात आले. जनतेच्या भल्यासाठी, देशाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने एकत्र येऊन 'टीम इंडिया'सारखे काम केले पाहिजे, असा सल्ला व्यंकय्या नायडूंनी यावेळी दिला. मुंबईत रिंग मेट्रो व्हायला हवी, मेट्रोच्या जाळ्याने संपूर्ण मुंबई जोडली गेली पाहिजे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. 
तर मुंबई मेट्रो-३ हा ऐतिहासिक प्रकल्प असून देशातील सर्वात मोठा भुयारी प्रकल्प असल्याचे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच हजारो कोटींच्या या प्रकल्पासाठी केंद्राची मदत आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
कुलाबा ते अंधेरी (सीप्झ) सुमारे ३२.५ किलोमीटर लांबीचा महानगरातील पहिला भूयारी रेल असून त्यासाठी तब्बल २३ हजार १३६ कोटी खर्च अपेक्षित आहे. देशातील आर्थिक राजधानीमध्ये मोनो, मेट्रो-१सेवा कार्यान्वित झाल्यानंतर दळणवळण श्रेत्रातील मेट्रो-३ हे महत्वपूर्ण प्रकल्प आहे. त्याच्या प्रत्यक्ष कामाला डिसेंबर अखेरीस प्रारंभ केला जाणार असून यामध्ये एकुण २७ रेल्वे स्थानकापैकी २६ भुयारी स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो-३ च्या निविदाची प्रकिया व तांत्रीक बाबीची पूर्तता झाल्यानंतर डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. नियोजित २७ स्थानकामध्ये नरीमन पाईट, बीकेसी, अंधेरी, एमआयडीसी, स्वीप्झ आदी व्यापारी ठिकाणाचा समावेश आहे
 

Web Title: Ajit Pawar should not be disrespected in the program - Ajit Pawar