शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

...तर आबा वाचले असते : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 2:35 AM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने दिवंगत आर. आर. पाटील (आबा) कॅन्सर साक्षर व कॅन्सरमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ रविवारी अजित पवार यांच्या हस्ते वानवडी येथे करण्यात आला.

पुणे : माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील अनेक तरुणांना व्यसनांपासून वाचवले. मात्र ते स्वत: तंबाखू सोडू शकले नाहीत. त्यांना झालेल्या कॅन्सरची लक्षणे वेळेत कळलीच नाहीत. अन्यथा आबा वाचले असते, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने दिवंगत आर. आर. पाटील (आबा) कॅन्सर साक्षर व कॅन्सरमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ रविवारी अजित पवार यांच्या हस्ते वानवडी येथे करण्यात आला.पुणे आणि मुंबईमध्ये हुक्का पार्लरची संस्कृती निर्माण होत आहे. हल्ली तरुण मुली मोठ्या प्रमाणात सिगारेट अथवा इतर व्यसने करत आहेत. तंबाखूसारख्या व्यसनांमुळे कॅन्सरचा धोका असतो. त्यामुळे तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे. वैद्यकीय संशोधनामुळे आता कॅन्सर पहिल्या टप्प्यामध्ये बरा होतो. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर कॅन्सरवर मात केली. पण सगळ्याकडे अशी इच्छाशक्ती नसते, असेही अजित पवार पुढे म्हणाले.शिवसृष्टीबाबत शासनाकडून फसवणूक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पुण्यातील कोथरुड येथील बीडीपीच्या जागेत महापालिकेकडून शिवसृष्टी तयार करण्यास मंजुरी दिली होती. तरीही शासनाने खासगी ट्रस्टच्या माध्यमातून आंबेगाव येथे उभारण्यात येणाºया शिवसृष्टीला तब्बल ३०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला. ही सरकारची दुटप्पी भूमिका असून, शासन पुणेकरांची फसवणूक करत आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला.खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली लाल महालावर अस्मिता परिषदेचा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाच्या समारोपप्रसंगी तेबोलत होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार