शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार म्हणाले, 'बहिणीविरोधात पत्नीला उभे करणे ही चूक'; सुप्रिया म्हणाल्या ‘रामकृष्ण हरी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 12:23 IST

राजकारण फार घरात शिरू द्यायचे नसते, मात्र माझ्याकडून थोडीशी चूक झाली, असेही अजित पवार म्हणाले

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे करणे, ही चूकच झाली अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी ‘रामकृष्ण हरी’ अशी प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा अजित पवार जोरदार प्रचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनेने घरातील लाडक्या बहिणींबद्दल प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी चूक झाल्याची कबुली दिली.

राजकारण घरात नको

सगळ्या बहिणी माझ्या लाडक्या आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, अनेक घरांत राजकराण चालते; पण राजकारण फार घरात शिरू द्यायचे नसते, असे सांगत मागे मात्र माझ्याकडून थोडीशी चूक झाली. मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभे करायला नको होते; पण त्यावेळेस ते झाले. पक्षाच्या पार्लमेंट बोर्डाने निर्णय घेतला. एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही; पण माझे मन आज सांगते आहे हे व्हायला नको होते, असे अजित पवार म्हणाले.

तर रक्षाबंधनाला जाणार!

अजित पवार दरवर्षी सुप्रिया सुळेंसह आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेतात. यावेळी बहिणींकडे रक्षाबंधनाला जाणार का, यावर अजित पवार म्हणाले की, माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. जर त्याच काळात मी इथेच असेन आणि माझ्या बहिणीही इथे असतील तर मी रक्षाबंधनाला जरूर जाणार.

हात जोडत म्हणाल्या....

‘एकतर मी हे विधान ऐकलेले किवा वाचलेले नाही. तुमच्याकडूनच मी हे ऐकत आहे. त्यामुळे ‘रामकृष्ण हरी’, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. यावेळी त्यांनी हात देखील जोडले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेSunetra Pawarसुनेत्रा पवारRaksha Bandhanरक्षाबंधन