शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

'या' कारणांमुळे अजित पवारांनी दिला राजीनामा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 06:48 IST

अजित पवारांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा का दिला, ते पुढे काय करणार, राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार का, या बाबत आता तर्कवितर्क लढविले जात आहेत. काका शरद पवार यांच्याशी मतभेद झाल्याने की प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दिले जात असलेले महत्त्व त्यासाठी कारणीभूत ठरले की लोकसभा निवडणुकीत मुलगा पार्थच्या पराभवाची किनार या राजीनाम्याला आहे या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

राजीनाम्याची संभाव्य कारणे काय...?1. ‘‘राज्य सहकारी बँकेची सूत्रे तुमच्या हाती होती. तुमच्यामुळे आज ईडीच्या कारवाईची पाळी आली आहे’’, असे बोल कुटुंबातीलच एका जबाबदार व्यक्तीने सुनावल्याने अजित पवार अस्वस्थ झाले आणि त्याच क्षणी त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला, अशी माहिती मिळते.2. अजित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होते, विशेषत: पुत्र पार्थ पवारांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तेव्हापासून.3. राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्यामुळेच पक्ष सोडला. विशेषत: विजयसिंह मोहिते, उदयनराजे यांनी त्यांच्यामुळेच पक्ष सोडल्याची चर्चा पक्षात सुरू होती.

4. जवळचे नातेवाईक पद्मसिंह पाटील, राणा जगजितसिंह पाटील यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी.5. विधानसभेला आपल्या समर्थकांना उमेदवारीबाबत डावलले जाण्याची दाट शंका6. पुतण्या रोहित पवार यांचे पक्षात वाढत असलेले वजन.7. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार यांनी फक्त स्वत:चा बचाव केला. अजित पवारांसह इतरांबद्दल ते काहीच बोलले नाहीत.8. शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादीच्या ध्वजासोबत भगवा ध्वज वापरून ‘सॉफ्ट हिंदुत्वाची’ लाईन घेतल्यामुळे शरद पवारांची नाराजी.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारparth pawarपार्थ पवार