शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

Ajit Pawar's Reaction On Raj Thackeray: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा: अजित पवारांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले, बोभाटा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 18:56 IST

Ajit Pawar Reaction On Chandrakant Patil's Himalaya statement: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार का? या प्रश्नावर देखील त्यांनी भाजपाला उत्तर दिले.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अयोध्या दौऱ्याची तारीख सांगितली. यावरून आता राजकारण रंगू लागले असून युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे त्या आधीच अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंनी अचानक घेतलेल्या या भूमिकेवर उप मुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. 

गिरगाव चौपाटीबाबत अनेक वर्षे मुंबईतील किंवा राज्यातील लोक येत असतात. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह अनेक लोक या रस्त्यावरून ये-जा करतात. असे असले तरी गिरगाव चौपाटीकडे दुर्लक्ष झाले होते. मी जाता येता काम पाहत होतो. आदित्य ठाकरेंनी चांगले काम केले. चांगल्या कामाला राजकीय भूमिकेतून विरोध करू नये, काहींनी सीआरझेडचे उल्लंघन केले, नियम पाळले नाहीत असे म्हणत विरोध केला, अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांवर टीका केली. 

मी माहिती घेतली असता सर्व नियम पाळले गेलेले आहेत. लोकांना सोयीचा वेळ या गॅलरीसाठी ठेवण्याचा प्रयत्न होईल. मुंबईत आमचा तरुण सहकारी जातीने लक्ष देऊन काम करतोय. फ्लायओव्हरच्या खाली रंगरंगोटी, गार्डन आदी करत आहेत. ज्या शहरांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी ही कामे करावीत, असा सल्लाही पवारांनी दिला. 

याचबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार का? या प्रश्नावर देखील त्यांनी भाजपाला उत्तर दिले.  निवडणुकीच्या काळात अनेक पक्षांचे नेते वेगवेगळी वक्तव्ये करत असतात. कुणीच सगळे सोडून हिमालयात जाणार नाही, विजय-पराजय होत असतो. यामुळे त्याकडे जास्त लक्ष देऊ नये. काहीजण स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी अशा पद्धतीने मते मिळविता येईल का, भावनिक कार्ड खेळता येईल का, काही वेगळा प्रयत्न करता येईल का. असे पाहत आहेत. त्याला काल कोल्हापुरात चपराक बसली आहे, असे अजित पवार म्हणाले.  

राज ठाकरेंच्या अयोध्या वारीवर छेडले असता अजित पवार म्हणाले की, कोणी अयोध्या वारी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याला जायचेय त्याने एवढा बोभाटा कशाला करायचा. आम्ही काहीतरी वेगळे करून दाखवतो हे प्रयत्न सुरु आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत मराठी माणसांना एकत्र केले. आम्ही तेव्हा विरोधात बसलो होतो. ते मराठी लोक आपल्यासोबत यावेत यासाठी कोणाला उत्साही आरती करावीशी वाटते, काही घोषणा कराव्या लागतात. आम्हीही काल आरती केली, परंतू त्यातून आम्ही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही निवडणुकीत योजना मांडू, विकासकामे केलीय त्यावर मते मागू, असे अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटील