शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रभरातून हजारो गाड्या बारामतीकडे यायला निघाल्या...! कार्यकर्त्यांना राहवेना, डोळ्यांत अश्रू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:49 IST

Ajit Pawar plane crash update Baramati: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्रभरातून हजारो कार्यकर्ते बारामतीकडे रवाना. शहरात भावूक वातावरण आणि मोठी गर्दी.

बारामती (पुणे): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचे पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्यांनी बारामतीची वाट धरली आहे. हजारो गाड्या बारामतीकडे येत असून, शहरातील रस्त्यांवर गर्दी झाली आहे. 

कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू, ओठांवर 'दादा'चे नावबारामतीकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर केवळ गाड्याच गाड्या दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, नागपूर आणि विशेषतः ग्रामीण भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने येत आहेत. अनेक कार्यकर्ते रस्त्याच्या कडेला थांबून ढसाढसा रडताना दिसत आहेत. "आमचा आधार गेला," अशा भावना व्यक्त करत कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. 

बारामतीत विदारक दृश्येपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. पोलीस प्रशासन गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

उद्या अंत्यसंस्कार...

अजित पवार यांचे पार्थिव आज संध्याकाळपर्यंत बारामतीत अंतिम दर्शनासाठी ठेवले जाण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघणार असून, त्यानंतर बारामतीतील मिशन हायस्कूल मैदानावर किंवा पवार कुटुंबाच्या शेतावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. राज्य सरकारने राजकीय शोक जाहीर केला असून, अंत्यसंस्कारावेळी त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन मानवंदना दिली जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Thousands of vehicles head to Baramati after Ajit Pawar's Death

Web Summary : Following reports of Ajit Pawar's death, thousands of supporters are heading to Baramati to pay their respects. Grief-stricken crowds gather, with the funeral planned for tomorrow, including state honors.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPlane Crashविमान दुर्घटना