Ajit Pawar Plane Crash : महानगर पालिका निवडणुका सुरू होत्या तेव्हापासूनच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांनी प्रयत्नही केले होते. काल (बुधवारी ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाला. अजित पवार यांच्या निधनाने राज्यात शोककळा पसरली. अनेक नेत्यांनी अजितदादांच्या आठवणी सांगितल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अजितदादांची एक आठवण सांगितली.
राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरणावर मोठे विधान केले आहे. १२ डिसेंबरला दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचे गिफ्ट साहेबांना देण्याचे अजित पवारांच्या मनात होते, असे काकडे यांनी म्हटले आहे. अंकुश काकडे म्हणाले, राजकारणातील माझी आणि अजित दादांची सुरुवात एकाच वेळेला झाली, दोघेही जिल्हा बँकेत एकत्रित निवडून आलो. आम्ही राजकारणात अनेक वर्ष काम केले. दादा हे आमचे नेते नेहमी राहिले, पवार साहेबांचा राजकीय वारसा घेऊन दादांनी केलेले काम महाराष्ट्र विसरू शकणार नाही, असंही काकडे म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा आग्रह केला होता
"मला राहून राहून दु:ख होतंय की अखेरच्या क्षणाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी, असा आग्रह अजित पवार यांनी मला केला होता,विठ्ठल शेठ, मणियार, श्रीनिवास पाटील, तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत, साहेबांशी बोला. दोन्ही राष्ट्रवादी एक कशा होतील यासाठी प्रयत्न करा.आम्ही जे प्रयत्न करता येणे शक्य होते ते करत होतो, पण दुर्दैवाने यश आले नाही, असंही काकडे म्हणाले.
"महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने एकत्र लढण्याचा निर्णय झाला होता, तो वरिष्ठ पातळीवर झाल्याने पुण्यातही झाला. पण आमचे अध्यक्ष सोडून गेल्याने आमची थोडी पंचायत झाली. अजित पवार यांच्याशी चर्चा करताना बऱ्यापैकी वाटाघाटी झाल्या होत्या. दोन्ही राष्ट्रवादी १२ डिसेंबरला एकत्र येणार होतो, पण येऊ शकलो नाही, ठीक आहे, निवडणुकीनंतर एकत्र येऊ,असंही अजित पवार यांनी म्हटल्याचे अंकुश काकडे यांनी सांगितले.
Web Summary : Nationalist leader Ankush Kakade revealed Ajit Pawar planned to unite both NCP factions by December 12 as a gift to Sharad Pawar. Kakade shared that Ajit Pawar urged him to facilitate the merger, expressing his desire for a united party before his death. Discussions were underway, but remained incomplete.
Web Summary : राष्ट्रवादी नेता अंकुश काकड़े ने खुलासा किया कि अजित पवार ने 12 दिसंबर तक दोनों एनसीपी गुटों को शरद पवार को उपहार के रूप में एकजुट करने की योजना बनाई थी। काकड़े ने साझा किया कि अजित पवार ने उनसे विलय की सुविधा के लिए आग्रह किया था, और अपनी मृत्यु से पहले एक संयुक्त पार्टी की इच्छा व्यक्त की थी। बातचीत चल रही थी, लेकिन अधूरी रही।