लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला महिना पूर्ण होत असतानाच, हवाई उड्डाण मंत्रालयाच्या ‘एएआयबी’ तपास यंत्रणेने या घटनेचा २२ पानांचा प्राथमिक तपास अहवाल प्रसिद्ध केला आहे. विमान कोसळण्यापूर्वी ते एका झाडाला धडकले होते, अशी माहिती या अहवालातून समोर आली आहे. या अहवालात अपघाताचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी, अपघाताला कारणीभूत ठरू शकणाऱ्या गंभीर त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे.
२८ जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. सध्या प्रसिद्ध झालेल्या अहवालात ब्लॅक बॉक्समधील तांत्रिक विश्लेषणाचा समावेश नाही. तपास यंत्रणांनी विमानाचा रॉ डेटा डाऊनलोड केला असून त्याचे बारकाईने विश्लेषण सुरू आहे.
नेमका अपघात कसा घडला?अहवालानुसार, मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या या व्हीआयपी फ्लाइटने रनवे ११ वर लँडिंगचा प्रयत्न केला होता. मात्र, पहिल्या प्रयत्नात वैमानिकाला लँडिंग करता आले नाही, त्यामुळे त्यांनी ‘गो-अराउंड’ केला. दुसऱ्या प्रयत्नात पायलटने “फिल्ड इन साइट” असा संदेश दिला.
एअर ट्रॅफिक कंट्रोलने ३ किलोमीटर इतकी दृश्यमानता नोंदवली होती, जी आवश्यक असलेल्या ५ किलोमीटरपेक्षा खूपच कमी होती. लँडिंग क्लिअरन्स मिळाल्यानंतर काही क्षणांतच विमान रनवेच्या डावीकडे ५० मीटर अंतरावर असलेल्या झाडावर आदळले आणि आगीत खाक झाले.
अहवालात काय म्हटले?बारामती विमानतळ अनियंत्रित असून अधिकृत ‘मेट’ सुविधा नाही. धावपट्टीवरील मार्किंग फिकट असून त्यावर बारीक खडी आढळली. तसेच स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याचे आढळले. उपग्रह चित्रांनुसार परिसरात हलके धुके होते, तरीही लँडिंगचा प्रयत्न झाला.
Web Summary : A preliminary report reveals Ajit Pawar's plane crashed near Baramati after hitting a tree during landing. Low visibility and inadequate airport facilities may have contributed. The investigation continues, focusing on black box data analysis to determine the exact cause.
Web Summary : प्रारंभिक रिपोर्ट में खुलासा हुआ कि अजित पवार का विमान बारामती के पास लैंडिंग के दौरान एक पेड़ से टकराकर दुर्घटनाग्रस्त हो गया। कम दृश्यता और अपर्याप्त हवाई अड्डे की सुविधाओं का योगदान हो सकता है। सटीक कारण जानने के लिए जांच जारी है।