Ajit Pawar Plane Crash : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका खळबळजनक ट्विटद्वारे VSR विमान कंपनीच्या कागदपत्रांमध्ये मोठी हेराफेरी होत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. विमानाचे तब्बल ३००० तासांचे रेकॉर्ड्स उपलब्ध नसल्याचा दावा करत त्यांनी तपासाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "VSR कंपनीकडे विमानाचा ५००० तासांचा प्रवास झाला असताना केवळ १८०० ते २००० तासांचाच रेकॉर्ड उपलब्ध आहे. उर्वरित ३००० तासांची माहितीच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे." या मिसिंग रेकॉर्ड्समध्ये कंपनीला फेरफार आणि बनवाबनवी करता यावी, यासाठीच जाणूनबुजून चौकशी लांबवली जात आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
'रोहित सिंग'ची चौकशी वादाच्या भोवऱ्यात
अपघाताच्या चौकशीसाठी रोहित सिंग याला पायलट म्हणून बोलावले गेल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. "महाराष्ट्राचा एक मोठा लोकनेता गेला असताना, अपघाताला जबाबदार असलेल्या कंपनीच्या मालकाला केवळ 'पायलट' म्हणून चौकशीसाठी बोलावणे हे संशयास्पद आहे," असे त्यांनी म्हटले आहे.
DGCA आणि CID मध्ये समन्वयाचा अभाव? आहे का असा सवालही पवार यांनी केला. "जेव्हा राज्य सीआयडी या प्रकरणाच्या गुन्हेगारी कोनातून तपास करत आहे, तेव्हा VSR चा मालक देशात आल्याची माहिती DGCA ने CID ला का दिली नाही?, असा सवाल रोहित पवार यांनी केला.
"DGCA आणि VSR कंपनीमध्ये मिलीभगत असल्याचा आरोप करत, सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे."
CBI चौकशी करणार
२८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाले होते. तेव्हापासून रोहित पवार या अपघातात तांत्रिक बिघाड नसून घातपाताची शक्यता असल्याचा दावा करत सतत पाठपुरावा करत आहेत. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या CBI चौकशीची शिफारस केल्याची माहिती दिली आहे.
Web Summary : Rohit Pawar alleges VSR company tampered with Ajit Pawar plane crash records. 3000 flight hours missing, raising concerns about investigation integrity and potential foul play.
Web Summary : रोहित पवार ने अजित पवार विमान दुर्घटना के रिकॉर्ड में वीएसआर कंपनी द्वारा हेराफेरी का आरोप लगाया। 3000 उड़ान घंटे गायब, जांच की अखंडता पर चिंता।