शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

"लंके माझ्याकडून लोकसभा लढविण्यास तयार होते"; अजित पवारांचा निलेश लंकेंबाबत मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 10:27 IST

Ajit pawar on Nilesh Lanke, Mahayuti Seat Sharing: राष्ट्रवादीचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर अजित पवारांनी आपली भुमिका मांडली आहे.

काल मुंबईत झालेल्या पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंकेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच लोकसभेला एकट्या भाजपाच्या सर्व्हेवर जागावाटप झाले आता तिन्ही पक्ष सर्व्हे करणार असल्याचे अजित पवारांनी जाहीर करत विधानसभेचे जागावाटप कसे होणार याचे सूत्र सांगितले. 

विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्ष आपापला सर्व्हे करतील, तिघांचेही सर्व्हे समोर ठेवले जातील. जे दोन सर्व्हे एका बाजुला जातील तिथे राष्ट्रवादी आपला उमेदवार देईल, असे अजित पवार गंमतीने म्हटले. यावर बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी आपणही सर्व्हे करणार असल्याचे म्हटले. तसेच ज्यांचे दोन सर्व्हे एकसारखे येतील ते मान्य करून त्यांचा उमेदवार देणार आहोत, असे स्पष्ट केले.  

२०१९ ला जिंकलेल्या ५४ जागांवर दावा करणार. या जागांवर नवाब मलिक यांचाही समावेश असणार. तसेच २०१९ मध्ये जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार पुढे होते त्या जागांवरही दावा करणार आहोत, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर अजित पवारांनी आपली भुमिका मांडली आहे. माझ्यासोबतचे आमदार जर परत गेले तर हरकत नाही. नव्यांना उभे करू, आमच्याकडे सध्या अनेक उमेदवार आहेत. अनेकांना संधी दिली ते चांगले काम करत आहेत, असे अजित पवार म्हणाले. 

निलेश लंके शरद पवारांसोबत का गेले?निलेश लंकेंना संधी देण्यासाठी मीच पुढाकार घेतला होता. लंके माझ्याकडून लोकसभा लढविण्यास तयार होते. त्यांना लोकसभा हवी होती. तिथे भाजपाचे खासदार असल्याने भाजपाने लंकेंसाठी जागा सोडली नाही. नगरची जागा धोक्यात असल्याची कल्पना दिली होती. भाजपाने ऐकले नाही. पालकमंत्र्यांनी त्रास दिला यामुळे त्यांच्यासाठी काम करणार नाही अशी लंकेंनी भुमिका घेतली होती. जवळच्या लोकांच्या क्रशर आणि खाणी बंद केल्याने आपल्याला फटका बसेल असे त्यांना वाटत होते, यामुळे लंके शरद पवारांसोबत गेल्याचे अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारnilesh lankeनिलेश लंकेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा