शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

रात्री अडीचला एक्स्प्रेस वेवर दिला एबी फॉर्म; अण्णा बनसोडेंच्या उमेदवारीची सांगितली कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:48 IST

हा किस्सा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभेचे उपाध्यक्ष झालेले अण्णा बनसोडे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रात्री अडीचला उमेदवारीचा एबी फॉर्म कसा दिला याचा किस्सा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत सांगितला.

बनसोडे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. पवार म्हणाले, '२०१९ मध्ये बनसोडे यांना उमेदवारी दिलेली नव्हती. मी तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना म्हणालो, अण्णाचे तिकीट कापू नका, तर ते म्हणाले, पक्षात सगळेच काही माझे चालत नाही. मी पक्षाचा नेता असल्याने जयंत पाटील यांनी मला काही जास्तीचे एबी फॉर्म मला दिले होते. त्यातलाच एक मी बनसोडे यांना एक्स्प्रेस वेवर रात्री अडीचला बोलावून दिला. ते म्हणाले, पक्षाने तर सुलक्षणा शीलवंत यांना तिकीट जाहीर केले आहे, मी म्हणालो, त्याचे तुला काय करायचे, उद्या सकाळी बरोबर ११ ला जाऊन उमेदवारी अर्ज भर. त्यानुसार बनसोडे यांनी अर्ज भरला आणि ते १७हजार मतांनी जिंकले.'

माझे त्यांनी ऐकले, फॉर्म भरला, जिंकले, आज उपाध्यक्ष झाले. राजकारणात माझे ऐकले तर किती भले होते बघा! अशी कोपरखळी अजित पवार यांनी शरद पवार गटाला मारली.

'...आणि त्यांचे मत बदलले'

बनसोडे यांचे अभिनंदन करताना जयंत पाटील यांनी दावा केला की, बनसोडे यांच्याऐवजी दुसऱ्याला तिकीट द्यायचे हे मी आणि अजितदादांनी मुंबईत बसूनच ठरविले होते पण दादा पिंपरीला गेले, तिथे त्यांना घेराव घालून बनसोडे यांना उमेदवारी देण्याची मागणी झाली आणि त्यांचे मत बदलले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार