- गणेश अंबिलवादेदेवळाली प्रवरा (जि. अहिल्यानगर) - अजित पवार यांचे आजोळ अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा. याच मातीत त्यांचे बालपण गेले गोट्यांचा खेळ हा त्यांचा आवडता छंद. सायकलवर फिरत त्यांनी सिनेमेही पाहिले.
दिवंगत अण्णासाहेब कदम हे अजित पवार यांचे मामा. लहान असताना पवार मामांच्या घरी दरवर्षी उन्हाळ्यात यायचे. मामेभाऊ अशोक कदम हेही गोट्या खेळण्यात पारंगत. त्यांच्यासोबत गोट्यांचा डाव रंगायचा. एकदा त्यांची सुटी संपल्यानंतर दादांचे वडील त्यांना घ्यायला आले. फियाट गाडी काटेवाडीकडे निघायला सज्ज झाली तरी अजितदादांचा गोट्यांचा डाव सुरूच होता. शेवटी हा डाव जिंकूनच ते गाडीत बसले. कित्येकदा खेळ पूर्ण होईपर्यंत त्यांच्या वडिलांना गाडी थांबवावी लागली, अशी आठवण पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांनी ‘लोकमत’ला सांगितली.
आजोळ देवळाली प्रवरा शोकसागरात अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच देवळाली प्रवरा गाव शोकसागरात बुडाले. संपूर्ण गावाने कडकडीत बंद पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ही बातमी ऐकल्यानंतर त्यांचे मामेभाऊ माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या भावनांचा बांध फुटला. कदम परिवाराच्या घरी नागरिकांनी भेटीसाठी गर्दी केली होती.
उन्हाळ्यात आजोळी सुट्टीवर आले की सिनेमा पाहणे व्हायचेअजितदादा आजोळला सुटीच्या दिवसांत आले तर श्रीरामपूरला थिएटरला सायकलवर सिनेमा पहायला हमखास जात. स्वत: अजित पवार यांनीच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान श्रीरामपूर येथील जाहीर सभेत हा किस्सा सांगितला होता. पवारांची बहीण नीताताई यांचा विवाह अहिल्यानगर जिल्ह्यात पढेगाव येथील बनकर परिवारात झालेला आहे. हाही त्यांचा जिल्ह्याशी आणखी एक नातेसंबंध आहे.
Web Summary : Ajit Pawar spent his childhood in Deolali Pravara, playing gotya (marbles) with his cousins. He enjoyed cycling to Shrirampur for movies during summer vacations. The village mourned his passing, remembering his deep connection to the community.
Web Summary : अजित पवार ने अपना बचपन देवलाली प्रवरा में बिताया, जहाँ उन्होंने अपने चचेरे भाइयों के साथ गोटियाँ खेलीं। गर्मियों की छुट्टियों में वे साइकिल से श्रीरामपुर फिल्में देखने जाते थे। उनके निधन पर गाँव में शोक छा गया, लोगों ने समुदाय से उनके गहरे जुड़ाव को याद किया।