अजित पवारांनी आणली विधानसभेत प्लास्टिक अंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:46 IST2017-08-05T01:46:37+5:302017-08-05T01:46:43+5:30

नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक अशा प्लास्टिक अंड्यांचा सुळसुळाट असून मीरारोड, मुंबई येथे अशा अंड्यांची राजरोसपणे विक्री होत आहे, असे सांगताना राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी आज सभागृहात चक्क ही प्लास्टिक अंडी दाखविली.

 Ajit Pawar brought the plastic egg in the assembly | अजित पवारांनी आणली विधानसभेत प्लास्टिक अंडी

अजित पवारांनी आणली विधानसभेत प्लास्टिक अंडी

विशेष प्रतिनिधी 
मुंबई : नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक अशा प्लास्टिक अंड्यांचा सुळसुळाट असून मीरारोड, मुंबई येथे अशा अंड्यांची राजरोसपणे विक्री होत आहे, असे सांगताना राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी आज सभागृहात चक्क ही प्लास्टिक अंडी दाखविली.
ही अंडी अतिशय घातक असून त्याची विक्री थांबवा आणि ही अंडी विकणाºयांवर कारवाई करा, अशी मागणी पवार यांनी केली. काही दिवसांपासून प्लास्टिकची अंडी विकली जात आहेत. मीरारोड येथील पूनमनगरमध्येही अशी प्लास्टिकची अंडी विकली जात असल्याचे पवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारच्या निदर्शनास आणले. ही अंडी जाळली असता, प्लास्टिक जळल्याचा वास येतो. लोकांच्या विशेषत: लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा घातक परिणाम होऊ
शकतो. सरकारने यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी पवार यांनी केली.

Web Title:  Ajit Pawar brought the plastic egg in the assembly