शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

रेल्वेनंतर आता बीडला विमानतळाची भेट; उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधिमंडळात घोषणा

By आनंद मोहरीर | Updated: March 17, 2025 19:17 IST

Ajit Pawar Beed Airport : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारण्याची घोषणा केली आहे.

Ajit Pawar Beed Airport : गेल्या काही दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख हत्याकांडासह विविध गुन्हेगारी घटनांमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar Announces Beed Airport) बीडमध्ये भव्य विमानतळ उभारण्याची घोषणा केली आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेचे स्वप्न पाहणाऱ्या बीडकरांना रेल्वेसह आता हक्काचे विमानतळही मिळणार आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी आज(17 मार्च 2025) रोजी विधिमंडळात बीड जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारण्याची अधिकृत घोषणा केली. सततचा दुष्काळ आणि गुन्हेगारी घटनांमुळे मागे पडलेल्या बीड जिल्ह्यासाठी हा अतिशय महत्वाचा निर्णय ठरणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक दशकांपासून रेल्वेचे स्वप्न पाहणाऱ्या बीडकरांसाठी रेल्वेसह विमानतळाचेही स्वप्न सत्यात उतरणार आहे. 

धनंजय मुंडेंनी मानले आभारअजित पवारंच्या निर्णयाबद्दल माहिती देताना माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे म्हणाले की, "राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांनी आज विधिमंडळात बीड जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारण्याची अधिकृत घोषणा केली. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल दादांचे आणि राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार! बीड जिल्ह्यातील जनतेचे बहुप्रतिक्षित स्वप्न मूर्त स्वरूपात साकार होणार आहे!"

"जिल्हा प्रशासनाने विमानतळ उभारणीचा परिपूर्ण प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडे सादर केला होता, त्यामुळे या प्रकल्पाला आता गती मिळेल. रेल्वेप्रमाणेच विमानसेवेचे स्वप्न साकार होणार आहे आणि या ऐतिहासिक निर्णयामागे वेळोवेळी मागणी करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे. हा विकास प्रकल्प बीडच्या भविष्याची नवी दिशा ठरू शकेल. या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचा विकास वेगाने साधला जाईल असा विश्वास वाटतो!" अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी व्यक्त केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBeedबीडAirportविमानतळDhananjay Mundeधनंजय मुंडे