शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"कुणाचे बटण कशा पद्धतीने दाबायचे, ते...", अजित पवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 11:36 IST

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी  चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले आहे.

पुणे :  गेल्या दोन दिवसांपूर्वी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेबारामतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी 2024 साली बारामतीचा खासदार हा भाजपचाच असेल असा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या काटेवाडी गावात आयोजित केलेल्या बूथ कमिटी आढावा बैठकीत ते बोलत होते. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्धार व्यक्त केल्यामुळे त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. 

यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी  चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, 2019 ची एक आठवण करून देत खोचक टोला देखील लगावला आहे. अजित पवार म्हणाले, "आम्हाला काहीही वाटत नाही. असे खूपजण येतात. गेल्या 55 वर्षांत असे कितीतरी जण आले आणि कितीतरी जण गेले. खूप लाटा आलेल्या आणि गेलेल्या बारामतीकरांनी पाहिल्या आहेत. बारामतीकरांना खूप चांगले माहित आहे की, कुणाचे बटण कशा पद्धतीने दाबायचे. ते त्या निवडणुकीत त्यांचे काम चोखपणे बजावतील. याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही." 

याचबरोबर, "बारामतीमध्ये माझे काम बोलते. त्यामुळे तुम्ही बारामतीची काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारं कुणी असेल, तर बारामतीकर त्याचा विचार करतील. मला प्रदेशाध्यक्षांना एक प्रश्न विचारायचे आहे की, तुम्ही एवढे संघटनेत काम करणारे, पक्षाच्या जवळचे होता, तर तुम्हाला, तुमच्या पत्नीला 2019 ला उमेदवारी का नाकारली? त्याचे उत्तर द्या. त्याचे उत्तर कुणी देऊ शकत नाही. अर्थात, हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. पण माझे मत आहे की कुणीही बारामतीत यावे. बारामतीकर सर्वांचे स्वागतच करतात. पण मतदानाच्या दिवशी कुणाला मतदान करायचे, कुठं बटण दाबायचे, हे बारामतीकरांना खूप चांगले माहिती आहे", अशा शब्दांत अजित पवारांनी चंद्रशेखर बावनकुळेंना टोला लगावला.

याशिवाय, प्रत्येकजण नवीन अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना एक हुरूप येतो. आपण काहीतरी करतो वगैरे. पण, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते ही वस्तुस्थिती आहे. ते अध्यक्ष बारामतीला न जाता दुसरीकडे गेले असते, तर एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. ते बारामतीला गेल्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला एवढी प्रसिद्धी मिळाली, असा टोलाही अजित पवारांनी हाणला.

दरम्यान, गेल्या मंगळवारी दिवसभर बारामती दौऱ्यावर असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या काटेवाडी शाखेचे उद्घाटन केले. यावेळी आमदार राहुल कुल गोपीचंद पडळकर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते. यादरम्यान चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरू केली आहे. तसेच, 2024 साली बारामतीचा खासदार हा भाजपचाच असेल असा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBaramatiबारामतीPoliticsराजकारण