शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 10:13 IST

Ajit Pawar Pratibha Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघात प्रतिभा पवार युगेंद्र पवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यावरून अजित पवारांनी मिश्कील विधान केले. 

Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचार रंगत येऊ लागली आहे. दोन्ही पवार कुटुंबीय मतदारसंघात फिरताना दिसत आहे. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारही युगेंद्र पवार यांचा प्रचार करताना दिसत आहेत. यावरूनच अजित पवारांनी प्रश्न उपस्थित केला आणि विधानसभा निवडणूक झाल्यावर काकींना विचारणार की, तु्म्हाला एवढा काय पुळका आला होता, त्या नातवाचा?, असे अजित पवार म्हणाले. 

पानसरे वाडी येथील ग्रामस्थांशी अजित पवारांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "मला पानसरेवाडीकरांना काही गोष्टी सांगायच्या आहेत. गावच्या पुढाऱ्यांचा राग काही माझ्यावर काढू नका. मी काही चुका केलेल्या नाहीत. मी असायचो मुंबईत. मी मुंबईतून योजना मंजूर करायचो. पैसे मंजूर करायचो, तुम्हाला पाठवायचो. तालुक्याच्या पुढाऱ्यांची नाराजीही माझ्यावर काढू नका." 

ही साहेबांची निवडणूक आहे का? अजित पवार

"भावनिक होऊ नका. कुणीतरी मला म्हटलं की, त्यांनी काय केलंय की, साहेबांचा (शरद पवार) मोठा फोटो लावला आहे आणि त्यांची खूण (निवडणूक चिन्ह) लावली आहे. साहेबांची निवडणूकच नाहीये ना. साहेबांची निवडणूक आहे का?", असा सवाल अजित पवारांनी केला.  मी गंजेडी, पिदाडा असतो, गोष्ट वेगळी होती -अजित पवार

"तुम्ही मला १९९१ पासून आमदार केलं. खासदार केलं. तेव्हापासून कधी प्रतिभा काकी आल्या का? आताच... काय नातवाचा पुळका आलाय, मला तर काही कळत नाही. जर मी खादाडा, पिदाडा, गंजेडी असतो, तर वेगळी गोष्ट... याने वाटोळं केलं बारामतीचं. हा फार बाद झालेला आहे. असं काही असतं, तर गोष्ट बरोबर आहे. माझं काय झालंय की, मी समोरच्यावर टीका करायला गेलो, तर तो आहे माझा पुतण्या. तो आहे मुलासारखा. पुन्हा आम्हीच आमच्या घरातील एकमेकांची निकाती करतोय असं होईल", असे मिश्कील विधान अजित पवारांनी केले.  

"मी पुन्हा तुम्हाला सांगतो भावनिक त्याठिकाणी होऊ नका. काकींना निवडणूक झाल्यावर विचारणार आहे की, काय एवढा पुळका आला त्या नातवाचा तुम्हाला? त्यावेळी मी विचारेन. आता विचारण्याची वेळ नाही. कधीही आपल्या बारामतीमध्ये ही गोष्ट केली नाही", असे अजित पवार ग्रामस्थांशी बोलताना म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024baramati-acबारामतीbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Ajit Pawarअजित पवारyugendra pawarयुगेंद्र पवार