शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
4
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
5
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
6
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
7
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
8
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
9
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
10
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
11
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
12
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
14
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
15
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
16
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
17
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
18
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
19
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
20
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला

MPSC: राज्यातील १५ हजार ५११ रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी: अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 15:54 IST

MPSC: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली होती.

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावरही पडल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील विविध विभागातील १५ हजार ५११ रिक्त पदांची MPSC कडून भरती करण्यात येणार आहे. या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. (ajit pawar announces that finance department approved  recruitment of 15 511 vacancies in the state)

एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली होती. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील विविध विभागातील १५ हजार ५११ रिक्त पदांची MPSC कडून भरती करण्यात येणार आहे. या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

“शेतकरी देशाचे दुश्मन आहे की पाकिस्तानातून आलेत?” भुजबळांची मोदी सरकारवर टीका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणार

ज्या ज्या विभागांनी रिक्त पदे भरण्याचे प्रस्ताव दिले, त्याला वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यानुसार, २०१८ पासून  विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणार आहेत. यापैकी गट अ - ४४१७, गट ब - ८०३१, तर गट क - ३०६३ इतकी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली. 

दरम्यान, राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका सर्वांनाच बसला. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. लोणकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्यात यापुढे अशी घटना घडणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.  

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाAjit Pawarअजित पवारState Governmentराज्य सरकार