अजित पवारांसह तिघांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा!

By Admin | Updated: October 11, 2014 05:56 IST2014-10-11T05:56:21+5:302014-10-11T05:56:21+5:30

गंगाखेड येथे ८ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास परळी नाका परिसरात पोलिसांनी केलेल्या तपासणीत स्कार्पिओमध्ये चार बॅगा आढळून आल्या होत्या.

Ajit Pawar and three people violate code of conduct! | अजित पवारांसह तिघांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा!

अजित पवारांसह तिघांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा!

परभणी : एक लाखापेक्षा अधिक रक्कम बाळगल्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिंतूरचे उमेदवार विजय भांबळे व त्यांचे बंधू संजय यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड येथे ८ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास परळी नाका परिसरात पोलिसांनी केलेल्या तपासणीत स्कार्पिओमध्ये चार बॅगा आढळून आल्या होत्या. त्यातील अजित पवार यांच्या एका बॅगमध्ये चार लाख रुपये, कपडे व अन्य साहित्य आढळून आले होते. त्यांचे स्वीय सहायक देशमुख यांच्या बॅगमध्ये ८५ हजार रुपयांची रोकडसह काही कागदपत्रे व कपडे आढळून आले होते.
भास्कर जाधव यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार
गुहागर : माजी कामगारमंत्री भास्कर जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात न केलेल्या विकासकामांचा उल्लेख करून त्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला असल्याचे नमूद केले आहे.जाधव यांनी मतदारांची दिशाभूल व फसवणूक केल्याची तक्रार अंजनवेलचे सरपंच यशवंत बाईत दिले आहेत.

Web Title: Ajit Pawar and three people violate code of conduct!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.