शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

Ajit Pawar: संभाजीराजेंनंतर अजित पवारांसोबत प्रकार! शिंदे, फडणवीसांची वाट पाहत तीन तास थांबले, निघून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 19:07 IST

दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम सुरु होणार होता. परंतू, तीन तास झाले तरी शिंदे आणि फडणवीस कार्यक्रमाला आले नाहीत. यामुळे अजित पवार तीन तास त्यांची वाट पाहत कार्यक्रमस्थळी थांबले होते.

काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे हे मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते. परंतू, त्यांनी वारंवार निरोप देऊनही शिंदेंनी भेट दिली नाही. यामुळे ते तेथून निघून गेल्याचा प्रकार घडला होता. आज दुपारी अजित पवारांच्या बाबतही असाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. 

मुंबईत आज फिफाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारांनाही निमंत्रित करण्यात आले होते. यामुळे अजित पवार वेळेवर कार्यक्रमाला पोहोचले. दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम सुरु होणार होता. परंतू, तीन तास झाले तरी शिंदे आणि फडणवीस कार्यक्रमाला आले नाहीत. यामुळे अजित पवार तीन तास त्यांची वाट पाहत कार्यक्रमस्थळी थांबले होते. अखेर कंटाळून अजित पवार निघून गेल्याचा प्रकार घडला आहे. 

अजित पवार निघून गेल्यावर शिंदे आणि फडणवीस जोडगोळी कार्यक्रमाच्या ठिकाणी आली. यानंतर कार्यक्रम सुरु झाला. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ बैठक लांबल्याने उशीर झाल्याचे कारण दिले आहे. परंतू, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. 

संभाजीराजेंसोबत काय घडलेले...मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी गेल्या आठवड्यात गुरुवारी दुपारी छत्रपती संभाजीराजे मुंबईला गेले होते.  मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आले असता त्यांना दीड ते दोन तास ताटकळत रहावे लागले. शिंदे यांनी भेट न दिल्याने छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेल्याचा प्रकार घडला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी तब्बल दीड ते दोन तास माजी खासदार संभाजीराजे यांची भेट टाळली. या कालावधीत ते पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत राहिले. संभाजीराजेंनी त्यांना वारंवार निरोप देऊनही शिंदेंनी भेट दिली नाही. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस