ऐश्वर्य हा स्मिताचा मुलगा, माझा नाही - जयदेव ठाकरे

By Admin | Updated: July 20, 2016 14:26 IST2016-07-20T14:10:53+5:302016-07-20T14:26:42+5:30

मी ऐश्वर्यचा पिता नाही, ऐश्वर्य हा स्मिता ठाकरेंचा मुलगा आहे असे आज जयदेव ठाकरे यांनी न्यायालयात सांगितले.

Aishwarya is Smita's son, not me - Jayadev Thackeray | ऐश्वर्य हा स्मिताचा मुलगा, माझा नाही - जयदेव ठाकरे

ऐश्वर्य हा स्मिताचा मुलगा, माझा नाही - जयदेव ठाकरे

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २० - मी ऐश्वर्यचा पिता नाही, ऐश्वर्य हा स्मिता ठाकरेंचा मुलगा आहे असे आज जयदेव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीवरुन वाद सुरु असून या प्रकरणाची सुनावणी सध्या उच्च न्यायालयात सुरु आहे.  
 
जयदेव ठाकरे यांनी न्यायालयाला ऐश्वर्य आपला मुलगा नसल्याचे सांगितले. बाळासाहेबांनी त्याला वारस केले असून, मातोश्रीत पहिला मजला दिला आहे. स्मिता ठाकरे ही जयदेव ठाकरे यांची पूर्वपत्नी आहे. दोघांचा घटस्फोट झाला आहे. 
 
आणखी वाचा 
 
स्मिता ठाकरे यांना राजकारणात पूर्वीपासून रस होता. मात्र, माँसाहेब गेल्यानंतर त्यांना राजकारणाची अधिक ओढ लागली. मात्र, बाळासाहेबांना  हे पटत नव्हते, असे जयदेव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीसंदर्भातील उलटतपासणीत सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांनी षड्यंत्र करून आपले नाव रेशन कार्डवरून हटवले, असा आरोपही जयदेव यांनी उच्च न्यायालयात केला. 

 

बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवरून जयदेव व उद्धव यांच्यात वाद सुरू झाला. जयदेव यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यावरील सुनावणी न्या. गौतम पटेल यांच्यापुढे होती. उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील रोहित कपाडिया यांनी जयदेव यांची उलटतपासणी घेतली. दुसऱ्या दिवशी जयदेव यांना सुमारे ८० प्रश्न विचारण्यात आले.

‘जाहीर सभांमध्ये जवळच्या व्यक्तीवर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करावी लागते. बाळासाहेब त्यांच्या निकटवर्तीयांवर अशीच टीका करायचे आणि रात्री सगळे एकत्र यायचे. हे मला पटत नसल्याने मी राजकारणापासून दूर राहिलो,’ असे जयदेव यांनी स्पष्ट केले. 

 

Web Title: Aishwarya is Smita's son, not me - Jayadev Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.