विमानतळ २०१९ मध्ये कार्यान्वित

By Admin | Updated: June 20, 2015 00:34 IST2015-06-20T00:24:52+5:302015-06-20T00:34:55+5:30

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा २०१९ मध्ये कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी एक कोटी प्रवासी वाहतूक होणार आहे.

Airport implemented in 2019 | विमानतळ २०१९ मध्ये कार्यान्वित

विमानतळ २०१९ मध्ये कार्यान्वित

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा २०१९ मध्ये कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी एक कोटी प्रवासी वाहतूक होणार आहे. पूर्ण प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला सहा कोटी प्रवासी वाहतूक होऊ शकणार आहे.
विमानतळासाठी पात्रता विनंती प्रक्रियेसाठी ५ फेब्रुवारी २०१४ मध्ये निविदा सूचना प्रसिद्ध केली होती. जीएमआर एअरपोर्ट, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. , झुरिच एअरपोर्ट अँड वोलुप्टास डेव्हलपर्स व एमआयए इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. सिडकोने निविदा मूल्यमापन समितीमार्फत अर्जांचे मूल्यमापन करून तयार करण्यात आलेला निरीक्षण अहवाल पुनरावलोकन व संमतीसाठी प्रकल्प निरीक्षण व अंमलबजावणी समितीकडे पाठविण्यात आले होते. चारही कंपन्या प्रकल्पासाठी पात्र ठरल्या आहेत. यामधील एक कंपनीने जगातील सातव्या क्रमांकाचा झुरिच विमानतळ विकसित केला आहे. जीएमआर व जीव्हीके या संस्थांनी दिल्ली व मुंबई विमानतळामध्ये जागतिक स्तरावरच्या सोयी -सुविधांची निर्मिती केली आहे. विन्सी कन्सेशन्स ही युरोपमधील सर्वात मोठी समूह कंपनी असून ती जगभरातील २३ विमानतळांचे व्यवस्थापन सांभाळते.

Web Title: Airport implemented in 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.