'एअरलिफ्ट' १०० कोटींच्या क्लबमध्ये
By Admin | Updated: February 1, 2016 14:06 IST2016-02-01T14:02:20+5:302016-02-01T14:06:41+5:30
अक्षय कुमार आणि निमरत कौर यांची मुख्य भूमिका असलेला 'एअरलिफ्ट' या वर्षातील १०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा पहिला चित्रपट ठरला आहे.

'एअरलिफ्ट' १०० कोटींच्या क्लबमध्ये
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - अक्षय कुमार आणि निमरत कौर यांची मुख्य भूमिका असलेला 'एअरलिफ्ट' या वर्षातील १०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. ९० च्या दशकात इराक-कुवेत युध्दात कुवेतमध्ये फसलेल्या १.७ लाख भारतीयांच्या सुटकेचा थरार या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे.
#Airlift has a FANTASTIC Sunday. Crosses ₹ 100 cr mark. [Week 2] Fri 4.50 cr, Sat 6.50 cr, Sun 8.26 cr. Total: ₹ 102.76 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) February 1, 2016अक्षय कुमारने नेहमीप्रमाणे या चित्रपटात जबरदस्त अभिनय केला आहे. बॉलिवुडमधल्या अनेक कलाकारांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. एअर लिफ्टच्या यशामुळे सत्यकथेवर आधारीत चित्रपटांची निर्मिती करायला प्रोत्साहन मिळाल्याचे अक्षयने सांगितले.
अशा चित्रपटांचा बॉक्स ऑफीसवरील आकडा उत्साहवर्धक नसतो. पण एअरलिफ्टच्या यशामुळे अधिकाधिक असे चित्रपट करायला प्रेरणा मिळाल्याचे अक्षयने सांगितले.