शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:55 IST

ऐश्वर्या तोष्णीवाल अहमदाबादच्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेजमध्ये अँकोपॅथोलॉजीच्या द्वितीय वर्षात शिकत आहे.

अकोला - जीवन आणि मृत्यूमध्ये काही क्षणाचं अंतर होते. परंतु प्रसंगावधान राखून अकोल्याच्या ऐश्वर्या तोष्णीवाल हिने भयानक विमान अपघातातून स्वत:चा जीव वाचवला आहे. १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच कोसळले. हे विमान ज्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला धडकले तिथेही मोठा स्फोट झाला. याच हॉस्टेलमध्ये पाचव्या मजल्यावर ऐश्वर्या होती. चहुबाजूने लागलेली आग आणि धुराच्या लोटात अडकलेल्या ऐश्वर्याने अंगावर ब्लँकेट ओढून जीव वाचवला आहे. या दुर्घटनेत ऐश्वर्या सुखरुप असल्याने कुटुंबानेही सुटकेचा निश्वास सोडला. 

ऐश्वर्या तोष्णीवाल अहमदाबादच्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेजमध्ये अँकोपॅथोलॉजीच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. अलीकडेच ती तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अकोला इथं आली होती. घटनेच्या दिवशी दुपारी १.३८ मिनिटांनी जेव्हा एअर इंडियाच्या फ्लाईटने लंडनसाठी उड्डाण घेतले तेव्हा ऐश्वर्या तिच्या हॉस्टेलमधील इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गाढ झोपेत होती. त्याचवेळी अचानक जोरदार स्फोट झाला. चहुबाजुने धुराचे साम्राज्य पसरले. मी जेव्हा झोपेत होते तेव्हा मोठा आवाज आला त्यामुळे मी चटकन जागी झाली. माझ्या खोलीत धूर पसरला होता. बाहेरून किंचळण्याचा आवाज येत होता असं तिने सांगितले. 

याच परिस्थितीत प्रसंगावधान राखत ऐश्वर्याने तिच्या खोलीतील ब्लॅंकेट उचलले आणि स्वत:भोवती गुंडाळून खोलीबाहेर आली. त्यावेळी इमारतीत आग लागली होती. सगळीकडे धूर पसरला होता. त्यात काळोखात तिने मार्ग शोधत शोधत पाचव्या मजल्यावरून खाली सुरक्षित आली. या घटनेत तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर आगीचे चटके बसल्याच्या खूणा आहेत. परंतु या भयानक स्थितीत तिने स्वत:ला सुरक्षित वाचवले आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात भयंकर अनुभव होता, इतक्या धुरामध्ये काहीच दिसत नव्हते तरीही मी त्यातून मार्ग काढून पुढे आली असं ती म्हटली. 

वडिलांना लावला फोन

अपघातातून सुखरुप वाचल्यानंतर ऐश्वर्याने सर्वप्रथम तिचे वडील अमोल तोष्णीवाल यांना फोन केला. ज्यावेळी ही दुर्घटना घडली तेव्हा ते अकोल्यातील त्यांच्या दुकानावर होते. मुलीचा थरथरणारा आवाज पाहून वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला. जेव्हा ऐश्वर्याचा फोन आला तेव्हा मी घाबरलो. टीव्हीवर अपघाताची बातमी पाहिली आणि मन सुन्न झाले होते. परंतु मुलगी सुरक्षित असल्याने जीवात जीव आला. अमोल यांनी तातडीने दुकान बंद केले आणि घरी पोहचले. मुलगी सुखरुप असल्याचे ऐकून आई, आजी-आजोबांनाही दिलासा मिळाला. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद