मुंबईत एअर इंडियाच्या विमानाची एअरोब्रिजला धडक
By Admin | Updated: July 1, 2016 18:52 IST2016-07-01T18:52:11+5:302016-07-01T18:52:11+5:30
मुंबईतील विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाची लँडिंग करताना एअरोब्रिजला धडक बसल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

मुंबईत एअर इंडियाच्या विमानाची एअरोब्रिजला धडक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - मुंबईतील विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाची लँडिंग करताना एअरोब्रिजला धडक बसल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
रियाधहून मुंबईला येणा-या एअर इंडियाच्या AI922 या विमानाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्किंग करताना ऐरोब्रीजला धडक बसली. या धडकेत विमानाच्या डाव्या बाजूला इंजिनला साधारण नुकसान झाले असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येते. तर एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, विमान पार्क करताना मार्गदर्शक सिस्टिमने चुकीची माहिती दिल्यामुळे ही घटना घडल्याचे समजते.
दरम्यान, या विमानातील सर्व प्रवाशी सुखरुप असून यामुळे विमानतळावर कोणत्याही विमान वाहतुकीवर परिणाम होणार नसल्याचे विमानतळ अधिका-यांनी सांगितले आहे.
Air India flight from Mumbai to Riyadh hits aerobridge at Mumbai's CST airport. More details awaited. pic.twitter.com/3Z2ENJ6CgK
— ANI (@ANI_news) July 1, 2016