सुप्रीम कोर्टात जाण्याचा एआयसीटीईचा विचार

By Admin | Updated: June 11, 2016 04:20 IST2016-06-11T04:20:37+5:302016-06-11T04:20:37+5:30

खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतला होता.

AICTE's idea of ​​going to the Supreme Court | सुप्रीम कोर्टात जाण्याचा एआयसीटीईचा विचार

सुप्रीम कोर्टात जाण्याचा एआयसीटीईचा विचार


मुंबई : नियमांची पायमल्ली करीत खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतला होता. मात्र त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत बहुतेक महाविद्यालयांनी एआयसीटीईच्या कारवाईवर स्थगिती मिळवली आहे. मात्र एआयसीटीई संबंधित महाविद्यालयांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार करीत असल्याचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
सहस्त्रबुद्धे म्हणाले की, उच्च न्यायालाच्या निर्णयावर अधिक भाष्य करता येणार नाही. मात्र १० वर्षांपूर्वी केलेल्या चुका सुधारण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई केलेली आहे. काही महाविद्यालयांना उच्च न्यायालयात दिलासा मिळाला असेल. मात्र त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात येईल, त्यानंतरच पुढची दिशा ठरवली जाईल.
कारवाईच्या कक्षेत असलेल्या महाविद्यालयांनी पायाभूत सुविधा उभारण्यास सुरुवात केली आहे, प्रतिज्ञापत्रात लिहिलेल्या माहितीनुसार परवानग्यांची पूर्तता करण्याची कार्यवाही सुरू केल्याचे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: AICTE's idea of ​​going to the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.