शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

अहमदनगर पुन्हा दुहेरी हत्याकांडाने हादरले, जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांची गोळ्या घालून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 9:38 PM

केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच जामखेड येथे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांचे हत्याकांड घडल्यामुळे जिल्हा पुन्हा हादरुन गेला आहे. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जणांचा मृत्यू झाला. 

जामखेड (अहमदनगर) : केडगावातील शिवसैनिकांचे हत्याकांड प्रकरण ताजं असतानाच आता जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन तरुण कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्यानं जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.  बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (वय 30 वर्ष) आणि कार्यकर्ता राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. 

योगेश राळेभात व  राकेश राळेभात हे दोघे दुकानासमोर बसलेले असताना संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून तीन अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून आले होते. त्यांनी गावठी कट्ट्यातून  योगेश व राकेश यांच्यावर लागोपाठ 8 गोळ्या झाडल्या. त्यानंतर तीनही हल्लेखोर मोटारसायकलवरुन पसार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांचे हत्याकांड घडल्यामुळे जिल्हा पुन्हा हादरुन गेला आहे.

दरम्यान, स्थानिकांनी दोघांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. परंतु वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे योगेश व राकेशला उपचाराअभावी अर्धा तास तसेच पडून होते. अर्ध्या तासाने वैद्यकीय अधीक्षक सी. व्ही. लामतुरे आल्यानंतर प्राथमिक उपचार करून जखमींना नगरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री राम शिंदे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.  यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नागरिकांचा संताप पाहून राम शिंदे यांनी तेथून काढता पाय घेतला. 

टॅग्स :Kedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडShiv SenaशिवसेनाRam Shindeप्रा. राम शिंदेAhmednagarअहमदनगरncp youth double murderराष्ट्रवादी युवक दुहेरी हत्याकांड