अहमदनगरमध्ये भाजपा नेत्याला मारहाण करुन लुटले
By Admin | Updated: August 11, 2016 08:46 IST2016-08-11T08:46:23+5:302016-08-11T08:46:23+5:30
अहमदनगरमधील अकोलेचे भाजप नेते शिवाजीराजे धुमाळ यांना मारहाण झाली आहे. मारहाणीदरम्यान त्यांच्या गाडीतून 5 लाख रुपयेही लंपास करण्यात आले आहेत

अहमदनगरमध्ये भाजपा नेत्याला मारहाण करुन लुटले
>ऑनलाइन लोकमत -
अहमदनगर, दि. 11 - अहमदनगरमधील अकोलेचे भाजप नेते शिवाजीराजे धुमाळ यांना मारहाण झाली आहे. मारहाणीदरम्यान त्यांच्या गाडीतून 5 लाख रुपयेही लंपास करण्यात आले आहेत. अकोले पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैद्य नावाच्या व्यक्तीने शिवाजीराजे धुमाळ यांना मारहाण केली असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाजीराजे धुमाळ यांना मारहाण झाली असल्याची माहिती मिळताच समर्थकांनी पोलीस ठाण्यात जमा होण्यास सुरुवात केली होती. मारहाणीच्या निषेधार्थ अकोले बंदचीही हाक देण्यात आली आहे.
शिवाजीराजे धुमाळ यापूर्वी शिवसेनेत होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी आणि विधानसभा निवडणुकीवेळी भाजपात प्रवेश केला.