शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 08:42 IST

Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे राज्यातील अनेक कुटुंबावर या अपघातामुळे दु:खाचं आकाश कोसळलं आहे. 

अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेने निघालेले एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले. बोईंग ७८७ ड्रीमलाइनर प्रकारातील या विमानात ११ लहान मुलांसह २४२ जण होते. या विमानामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे राज्यातील अनेक कुटुंबावर या अपघातामुळे दु:खाचं आकाश कोसळलं आहे. खासदार तटकरे यांच्या भाच्याच्या पत्नीचा मृत्यू

अलिबाग : अहमदाबाद विमान अपघातात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमाेल महाडिक यांच्या पत्नी अपर्णा यांचा मृत्यू झाला. त्या विमानात सिनिअर क्रु-मेंबर म्हणून काम करीत होत्या. या घटनेची माहिती कळताच राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे  मुंबईतील गाेरेगाव येथील महाडिक यांच्या घरी पाेहाेचल्या. खासदार तटकरे यांच्या मोठ्या भगिनीच्या अपर्णा या सूनबाई होत्या. त्यांचे पतीसुद्धा एअर इंडियामध्ये कार्यरत आहेत.  महाडिक कुटुंब मुंबईतील गोरेगाव येथे वास्तव्यास आहे.

एक दिवस आधीच आई-वडिलांना भेटून गेली होती मैथिली 

- मधुकर ठाकूर उरण (जि. रायगड) : अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात एअर होस्टेस म्हणून काम करत असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटील (२२) हिचाही समावेश आहे. विमान अपघाताची खबर मिळताच कुटुंबीय गुरुवारी दुपारीच अहमदाबादकडे रवाना झाले असल्याची माहिती निकटवर्तीय जितेंद्र म्हात्रे यांनी दिली. मैथिली मागील दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये क्रू मेंबरमध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती. गुरुवारी अहमदाबादहून लंडनकडे रवाना होणाऱ्या विमानात मैथिलीची ड्युटी होती. त्यामुळे विमान दुर्घटनेच्या आदल्या दिवशी बुधवारी मैथिलीने आपल्या आई-वडील व कुटुंबीयांसोबत पूर्ण दिवसभराचा वेळ व्यतित केला. त्यानंतर गुरुवारी सकाळीच मुंबईमार्गे मैथिली मुंबईहून अहमदाबाद येथील एअरपोर्टला रवाना झाली होती. त्यानंतर एअर इंडियाचे हे विमान १२ क्रू सदस्यांसह २४२ प्रवाशांना घेऊन अहमदाबादवरून लंडनला जात असतानाच रहिवासी भागात दुर्घटनाग्रस्त झाले. मैथिलीचे वडील, आई, मामा तातडीने अहमदाबादकडे रवाना झाले. 

लंडनमधील मुलाला भेटण्यासाठी निघालेल्या माता-पित्याचा मृत्यु

सोलापूर : अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी उड्डाणानंतर कोसळले. या दुर्घटनेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील हातीद गावातील महादेव तुकाराम पवार (वय ६८) व आशाबेन महादेव पवार (वय ६०)  या दाम्पत्याचा समावेश आहे. १८५ व १८६ नंबरच्या आसनावर महादेव व आशाबेन बसले होते. या दोघांना दोन मुले आहेत. एक मुलगा लंडनमध्ये असून, दुसरा मुलगा गुजरातमध्ये चालक म्हणून काम करतो. गुरुवारी दुपारी महेश पवार हे  विमानतळावर महादेव व आशाबेन यांना सोडायला गेले होते. सोडून बाहेर आल्यावर विमान अपघाताची माहिती कळाली अन् त्याने कुटुंबीयांना माहिती दिली. कापड मिलमध्ये होते नोकरीलापवार कुटुंबीय हे नडीयाद (जि. खेडा, राज्य - गुजरात) येथे राहण्यास आहेत. नडीयाद (गुजरात) येथील कापड मिल येथे काम करत होते. सध्या निवृत्त झाले होते. गुरुवारी ते दोघे लंडनमध्ये राहणाऱ्या मुलाकडे एअर इंडियाच्या विमानाने जात होते. दोघेही अपघातात मरण पावले. ही माहिती महेश पवार यांनी हातीदच्या नातेवाइकांना कळविली. हातीद येथे शोककळा पसरली आहे.

दीपक आम्हाला सोडून जाणार नाही; बहीण श्रुती यांचा आक्रोश

बदलापूर - अहमदाबादहून लंडनला निघालेल्या अपघातग्रस्त विमानात माझा भाऊ व विमानातील केबिन क्रू दीपक पाठक होता. आमचा भाऊ आम्हाला सोडून जाणार नाही, असा माझा विश्वास आहे. माझा देवावर भरवसा आहे, अशा शब्दांत दीपकची बहीण श्रुती पाठक हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. लंडनला उड्डाण करण्यापूर्वी दीपक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट टाकून ते अपडेट केले होते. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील प्रवासी, दहा कर्मचाऱ्यांसह २४२ जणांमध्ये बदलापूरचे दीपक पाठक यांचा समावेश आहे. दीपक पंधरा वर्षांपासून एअर इंडियात नोकरीला आहेत. गुरुवारी सकाळी टेकऑफ करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियात पोस्ट टाकून अपडेट केले होते. विमानाला अपघात झाल्याची बातमी समजताच शेजाऱ्यांसह स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. दीपकचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला. आजही आम्ही आशावादी आहोत. जोपर्यंत अपघाताची सर्व माहिती उघड होत नाही, तोपर्यंत आम्ही कोणतीही बाब मान्य करणार नाही, असे श्रुती म्हणाल्या. दीपक यांना दोन बहिणी आहेत.

क्रू मेंबर रोशनीचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न राहिले अधुरे

डोंबिवली : अहमदाबाद विमान दुर्घटनेत डोंबिवली पूर्वेतील रहिवासी रोशनी सोनघरे (२७, रा. उमिया बिल्डिंग) हिचे निधन झाले. ती दोन वर्षांपासून एअर इंडियात क्रू मेंबर म्हणून कामाला होती. तिला एअर होस्टेस व्हायचे होते. ते तिचे स्वप्न अधुरे राहिल्याची खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली.तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे. भाऊ विघ्नेश हा शिपिंग कंपनीत कामाला आहे. वडील राजेंद्र सोनघरे टेक्निशियन म्हणून काम करतात. रोशनी या आधी स्पाइस जेट या विमान कंपनीत कामाला होती. लहानपणापासूनच तिचे एअर होस्टेस होण्याचे स्वप्न होते. आई राजश्री हिच्याशी ती अपघातापूर्वी सकाळी फोनवर बोलली होती, तेच तिचे घरच्यांशी शेवटचे संभाषण झाल्याचे सांगण्यात आले. घटना कळताच तिचे वडील, भाऊ अहमदाबाद येथे रवाना झाले. आई घरीच असून, आईचा भाऊ रोशनीचा मामा प्रवीण सुखदरे यांनी ही माहिती दिली. डोंबिवलीतआधी ते ग्रँटरोड येथे वास्तव्याला होते.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्र