कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे निवृत्ती वृत्ती वय ६२ वर्षे!
By Admin | Updated: February 27, 2015 00:27 IST2015-02-27T00:27:53+5:302015-02-27T00:27:53+5:30
कुलगुरूंच्या नवृत्तीचे वय ७0 केव्हा करणार, आयसीएआरचा मॉडेल अँक्ट शासनाने गुंडाळला.

कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे निवृत्ती वृत्ती वय ६२ वर्षे!
अकोला: राज्यातील चारही कृषी विद्यापीठ आणि नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या प्राध्यापक, शास्त्रज्ञांचे नवृत्तीवय ६२ वर्ष करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. कृषी विद्यापीठातील ५0 टक्केपेक्षा जास्त रिक्त असलेल्या पदावर तोडगा म्हणून शासनाने या निर्णयाला बुधवारी मंजुरात दिली आहे. या प्रमाणेच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मॉडेल अँक्टनुसार कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू ंचे नवृत्तीचे वय ७0 वर्ष करणे क्रमप्राप्त असताना मॉडेल अँक्ट मात्र शासनाने गुंडाळला आहे.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. विद्यापीठांच्या स्थापनेपासून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत गेल्याने प्राध्यापक, शास्त्रज्ञांचा ५0 टक्केपेक्षा अधिक अनुशेष या विद्यापीठांमध्ये निर्माण झाला आहे. त्याचे परिणाम मात्र कृषी विद्यापीठांच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यावर होत आहे. या पृष्ठभूमीवर भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे नवृत्तीवय ६२ करण्यासंदर्भात राज्य शासनाला कळवले होते. यासंबंधीचा निर्णय पंधरा दिवसांपूर्वी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने शासनाकडे पाठवला होता. शासनाने बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून, २४ फेब्रुवारी २0१५ पासून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना हा निर्णय लागू झाला आहे.
आयसीएआरने देशातील कृषी विद्यापीठांसाठी मॉडेल अँक्ट लागू केला आहे. या अँक्टनुसार देशातील सर्व कृषी विद्यापीठांची कार्यपद्धती सारखी असावी, यासाठीची तरतूद केली आहे. या अँक्टनुसार कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूं चे नवृत्तीचे वय ७0 वर्ष असावे, यासाठी आयसीएआरने राज्यशासनाला पत्र दिलेले आहे. कृषी विद्यापीठांना स्वायत्ता देण्यासंबंधीची या मॉडेल अँक्टमध्ये तरतूद आहे. देशातील इतर राज्यात कुलगुरूं ची सेवानवृत्तीची वयोर्मयादा ७0 करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने शासनला शिफारस केली आहे. पण राज्यशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू ंचा कार्यकाळ संपला आहे. पण अनुभव आणि कृषी विद्यापीठांचा विविध पदावर काम केलेली योग्य व्यक्ती मिळत नसल्याने या विद्यापीठाला कुलगुरू मिळणे कठीण झाले आहे. या पृष्ठभूमीवर या राज्यातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू लवकरच राज्यपाल, मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांना भेटणार आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ तुकाराम मोरे यांनी कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापकांचे नवृत्तीवय ६२ वर्ष केले आहे. अत्यंत चांगला निर्णय झाला असल्याचे सांगीतले. तसेच कुलगुरूचे नवृत्तीवय ७0 वर्ष करण्याची गरजही व्यक्त केली.