शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता, शेतीत गुंतवता का? कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 09:40 IST

कर्जमाफीवरुन प्रश्न विचारता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले.

Agriculture Minister Manikrao Kokate on Loan Waiver:  राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानावर बरीच टीका झाली. सगळी सोंग करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही, शेतकऱ्यांनी ३१ मार्च पूर्वी पीककर्जाचे पैसे भरा, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या विधानावरुन अजित पवारांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता कर्जमाफीबाबत विचारताच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले. कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचे तुम्ही काय करता असा उलट सवाल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला. कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता असेही कृषीमंत्री म्हणाले.

बारामतीमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन विधान केलं होतं. माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफीबद्दल ऐकलं का? कर्जमाफीसारखी सध्या तरी आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह कर्जदारांनी ३१ मार्चपूर्वी बँकांमध्ये कर्जाची परतफेड करा, असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता शेतकरी एक रुपयाची तरी गुंतवणूक करतो का असा सवाल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या भेटीदरम्यान कृषीमंत्री कोकाटे यांनी कर्जमाफीबाबत हे विधान केलं.

"तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्याचे तुम्ही काय करता? शेतीमध्ये  एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे त्याची. सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आहे आता तुम्हाला. शेतीच्या पाईपलाईनसाठी, सिंचनासाठी पैसे मिळतात. भांडवली गुंतवणूक सरकार देते. शेतकरी करतो का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे. मग साखरपुडे करा लग्न करा," असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले. 

"कृषीमंत्र्यांची जबाबदारी फार मोठी असते. विदर्भ, मराठवाडा या भागांमध्ये नुकसान झाले आहे. नाशिक भागात कांदे, डाळिंबाचे नुकसान झाले आहे. या सगळ्यात कृषीमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आश्वस्त करणे गरजेचे होतं. पण हे सरकार संवेदना नसलेले आहे. या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत," अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेFarmerशेतकरीAjit Pawarअजित पवार