शेतीतील प्रयोगाने मंदाबाईंना सुवर्ण!
By Admin | Updated: January 25, 2015 00:57 IST2015-01-25T00:57:02+5:302015-01-25T00:57:02+5:30
प्रयोगशीलता आणि विजिगीषू वृत्ती अंगी असेल तर त्यासाठी विद्यापीठात जाण्याची गरज नाही. शेतीच्या बांधावरदेखील तुमच्या हातून किती दर्जेदार संशोधन होऊ शकते,

शेतीतील प्रयोगाने मंदाबाईंना सुवर्ण!
संजय कुलकर्णी - जालना
प्रयोगशीलता आणि विजिगीषू वृत्ती अंगी असेल तर त्यासाठी विद्यापीठात जाण्याची गरज नाही. शेतीच्या बांधावरदेखील तुमच्या हातून किती दर्जेदार संशोधन होऊ शकते, हेच जालना जिल्ह्यातील वाहेगाव येथील मंदाबार्इंनी सिद्ध केले आहे. सातवी पास असलेल्या मंदाबार्इंनी थेट परभणी कृषी विद्यापीठाच्या ‘परभणी मोती’ या ज्वारी वाणावर पेरणीपासून काढणीपर्यंत विविध प्रयोग करून सर्वाधिक उत्पादन काढले. त्यांच्या या जिज्ञासू आणि प्रयोगशीलतेची दखल घेत आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेने सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव केला आहे.
बदनापूरपासून १५ कि़मी. अंतरावरील बाजार वाहेगाव येथील भिकाजी ऊर्फ बाबूराव काळे यांना ७ एकर शेतजमीन.पतीच्या मदतीने तसेच परभणी कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने मंदाबार्इंनी ‘परभणी मोती’वर विविध प्रयोग करत एकरी १२ ते १३ क्विंटलवर उत्पन्न घेतले. याची दखल देशपातळीवर घेतली. मंदाबार्इंना याबाबत हैदराबादला सुवर्णपदक जाहीर झाले!
बाजार वाहेगाव येथे मंदाबाई भिकाजी काळे यांनी स्वत:च्या शेतातील बियाणे स्वत: गोळा करून मेहनतीने वाण टिकवले. त्याद्वारे उत्पादन वाढविल्याबद्दल काळे यांना सुवर्णपदक जाहीर झाले. डॉ. आर. एल. औंढेकर
शास्त्रज्ञ कृषी विद्यापीठ, परभणी