राज्यातील कृषी महाविद्यालये परप्रांतीयांकडून ‘हायज्ॉक’ !

By Admin | Updated: July 2, 2014 00:30 IST2014-07-02T00:26:46+5:302014-07-02T00:30:24+5:30

खाजगी कृषी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातून परप्रांतीय विद्यार्थ्यांंना सर्रास प्रवेश दिला जात असून, या प्रवेशापोटी त्या विद्यार्थ्यांंकडून लाखो रू पये डोनेशन घेतले जात आहे.

Agricultural colleges in the state are 'HYJOC' from parasites! | राज्यातील कृषी महाविद्यालये परप्रांतीयांकडून ‘हायज्ॉक’ !

राज्यातील कृषी महाविद्यालये परप्रांतीयांकडून ‘हायज्ॉक’ !

अकोला : राज्यातील खाजगी कृषी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातून परप्रांतीय विद्यार्थ्यांंना सर्रास प्रवेश दिला जात असून, या प्रवेशापोटी त्या विद्यार्थ्यांंकडून लाखो रू पये डोनेशन घेतले जात आहे. या प्रकारामुळे कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विदर्भ, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांंमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.
राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांंना कृषी शिक्षण घेता यावे, यासाठी राज्य शासनाने कृषी विद्यापीठांतर्गत नवीन कृषी महाविद्यालये सुरू केली असून, जागादेखील वाढविल्या आहेत. तसेच खासगी कृषी महाविद्यालयांनाही अनुमती दिली आहे. राज्यात आजमितीस ६४ खासगी कृषी महाविद्यालये आहेत. यात सात उद्यानविद्या, १६ जैवतंत्रज्ञान व आठ कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. यातील विदर्भात १६ कृषी, दोन उद्यानविद्या, एक जैवतंत्रज्ञान व एक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश आहे. या सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांंना महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषदेकडे (एमसीईएआर) ऑनलाईन अर्ज भरावे लागतात. एमसीईएआरकडून या अर्जाची गुणवत्ता यादी तयार केली जाते. तीन टक्के जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार इतर राज्यातील विद्यार्थ्यांंकरीता राखीव असतात. २0 टक्के जागांवर व्यवस्थापन समितीव्दारे प्रवेश दिला जातो. त्यासाठी एसीएईआरच्या यादीत विद्यार्थ्यांंचे नाव असणे अनिवार्य असते. म्हणूनच जो तीन टक्के केंद्रीय पध्दतीने प्रवेश दिला जातो, त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात घोळ घातला जात आहे. या विद्यार्थ्यांंकडून लाखो रू पये डोनेशन घेऊन प्रवेश दिला जात असल्याचा आरोप विदर्भ, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांंंकडून केला जात आहे.
प्रवेश घेण्यासाठी या परप्रांतीय विद्यार्थ्यांंकडून प्रत्येकी आठ लाख रू पये घेतले जात असल्याचा आरोप होत आहे. कृषी अभ्यासक्र मासाठी प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यातील कृषी महाविद्यालयांमध्ये हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने या महाविद्यालयांची सुरू वात करण्यात आली आहे, त्यालाच हरताळ फासला जात आहे.

Web Title: Agricultural colleges in the state are 'HYJOC' from parasites!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.