सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखान्यात अग्नितांडव

By Admin | Updated: May 11, 2017 14:01 IST2017-05-11T14:01:59+5:302017-05-11T14:01:59+5:30

सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर साखर कारखान्यात मशिनरीला भीषण आग लागली आहे.

Agnitandav in Siddheshwar sugar factory at Solapur | सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखान्यात अग्नितांडव

सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखान्यात अग्नितांडव

>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 11 -  सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर साखर कारखान्यात मशिनरीला भीषण आग लागली आहे.  अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.  सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्लांटमध्ये ही आग लागली आहे. या दुर्घटनेत मशिनरीचं मोठं नुकसान झाले आहे..
 
आगीनं रौद्र रुप धारण केले आहे. या अग्नितांडवावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करत आहेत. 
 
दरम्यान, आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही.
 
सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 
 
 
 

Web Title: Agnitandav in Siddheshwar sugar factory at Solapur