वृद्ध मातेने नोंदविला मुलांविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: April 20, 2017 06:00 IST2017-04-20T06:00:51+5:302017-04-20T06:00:51+5:30

आपला सांभाळ करीत नसल्याने संतप्त झालेल्या ७७ वर्षीय मातेने दोन मुलांविरुद्ध येथील सिडको पोलिसांत तक्रार दाखल केली आहे

An aged mother reported crimes against children | वृद्ध मातेने नोंदविला मुलांविरुद्ध गुन्हा

वृद्ध मातेने नोंदविला मुलांविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद : आपला सांभाळ करीत नसल्याने संतप्त झालेल्या ७७ वर्षीय मातेने दोन मुलांविरुद्ध येथील सिडको पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अशा प्रकारचा शहरातील पहिलाच गुन्हा नोंद झाला आहे.
बाबुलाल आणि रमेश दादाराव घारे अशी गुन्हा दाखल झालेल्या मुलांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार कौशल्याबाई दादाराव घारे या संभाजी कॉलनीत मुलांकडे आणि सुनाकडे राहतात. दोन वर्षांपासून मुले आणि सुना त्यांना त्रास देत असल्याचे समजल्याने नातेवाइकांनी मुलांची समजूत काढली होती. त्यानंतरही मुलांकडून त्यांना त्रास देणे सुरूच असल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
दोन ते तीन दिवसांपासून त्या गल्लीतील ओट्यावर बसून आहेत. ओट्यावरच त्या झोपतात आणि गल्लीतील लोकांनी दिलेले अन्न खातात. त्यांची दोन्ही मुले त्यांच्याजवळून जातात. मात्र ते आईशी बोलतही नाहीत. ते सांभाळ करीत नसल्याने आपल्याला वृद्धाश्रमात टाकावे आणि मुलांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: An aged mother reported crimes against children