‘वयाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही’

By Admin | Updated: November 12, 2015 03:00 IST2015-11-12T03:00:18+5:302015-11-12T03:00:18+5:30

दिवाळीनिमित्त दहा दिवसांसाठी साडेतीन वर्षांच्या मुलीचा ताबा तिच्या वडिलांकडे रात्रंदिवस देताना मुलीच्या वयाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही

'Age can not be ignored' | ‘वयाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही’

‘वयाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही’

मुंबई : दिवाळीनिमित्त दहा दिवसांसाठी साडेतीन वर्षांच्या मुलीचा ताबा तिच्या वडिलांकडे रात्रंदिवस देताना मुलीच्या वयाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाच्या निर्णयावर टीका केली.
वांद्रे कुुटुंब न्यायालयाने ६ नोव्हेंबर रोजी साडेतीन वर्षीय मुलीचा ताबा तिच्या वडिलांकडे दहा दिवसांसाठी दिला. मुलीच्या वयाच्या सबबीखाली वडिलांना मुलीचा ताबा देण्यास नकार दिला जाऊ शकत नाही, कुटुंब न्यायालयाने नोंदविले होते.
कुुटुंब न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध मुलीच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर उच्च न्यायालयाने १६ नोव्हेंबर रोजी या अर्जावरील सुनावणी घेण्याचे आदेश कुुटुंब न्यायालयाला दिले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Age can not be ignored'