शुल्कवाढ प्रकरणी विनोद तावडे यांना पुन्हा घेराव

By Admin | Updated: May 12, 2017 17:38 IST2017-05-12T17:38:38+5:302017-05-12T17:38:38+5:30

बेकायदेशीरपणे शुल्कवाढ करणाऱ्या शाळांवर काहीच कारवाई होत नसल्याने शुक्रवारी पालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पुन्हा घेराव घेतला

Against Vinod Tawde | शुल्कवाढ प्रकरणी विनोद तावडे यांना पुन्हा घेराव

शुल्कवाढ प्रकरणी विनोद तावडे यांना पुन्हा घेराव

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 12 : बेकायदेशीरपणे शुल्कवाढ करणाऱ्या शाळांवर काहीच कारवाई होत नसल्याने शुक्रवारी पालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पुन्हा घेराव घेतला. यापार्श्वभुमीवर पुण्यातील भरमसाठ शुल्कवाढ करणाऱ्या १८ शाळांचे व्यवस्थापन व पालक यांना सोमवारी सुनावणी मुंबईत बोलाविण्यात आले असून यावेळी याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे विनोद तावडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय विज्ञान संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने विनोद तावडे पुण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर पालकांनी शुल्कवाढ प्रकरणी काहीच कारवाई झाली नसल्याचे तावडे यांच्या निर्दशनास आणून देऊन त्यांना घेराव घातला. त्यानंतर तावडे यांनी सर्व पालकांशी चर्चा तासभर चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले.

विनोद तावडे यांनी सांगितले, ह्यह्यशुल्कवाढी संदर्भात पुण्यातील १८ शाळांच्या तक्रारी आलेलया आहेत. त्यांना सुनावणीसाठी मुंबईला बोलाविण्यात आले आहे. या सुनावणीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. शाळांमधूनच पुस्तके व इतर शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जाऊ नये याबाबतच्या सुचना पालकांना देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी शाळांविरोधात ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.ह्णह्ण

पीएचडीचे संशोधन योग्य होत नसल्याची केवळ टिकाच करून थांबणार नसून या संशोधनासाठी विद्यापीठांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. खाजगी कंपन्यांच्या उत्कृष्ट लॅबची मदत पीएचडी संशोधनासाठी मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले

Web Title: Against Vinod Tawde