देवनार डम्पिंग ग्राऊंडवर पुन्हा भीषण आग
By Admin | Updated: January 30, 2016 13:00 IST2016-01-30T11:51:08+5:302016-01-30T13:00:29+5:30
मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवर आज सकाळी पुन्हा भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या १२ गाड्या तसेच ६ वॉटर टँकर्स दाखल झाले आहेत.

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर पुन्हा भीषण आग
दरम्यान या आगीप्रकरणी महापालिका आयुक्तांशी आपले बोलणे झाले असून ही आग लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खासदार पूनम महाजन यांनी सांगितले आहे.
डम्पिंग ग्राऊंडचा धूर बी.के.सीला घेऊन जाणार - सचिन अहिर
पहिले डम्पिंग ग्राऊंडचा विषय मार्गी लावा नंतर 'मेक इन इंडिया'चा विचार करा असे सांगत दरम्यान या मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पहिले 'मेक मुंबई' मग 'मेक इन इंडिया' असे सांगत बीकेसी मैदानावर आंदोलन करून परदेशी गुंतवणूकदारांना डम्पिंग ग्राऊंडच्या ज्वाळा दाखवू असे ते म्हणाले. इतके वर्ष सत्ता महापालिकेवर सत्ता असतानाही शिवसेना- भाजपाने काय काम केलं आहे, हे जगालाही कळू दे, अशी टीका अहिर यांनी केली.