म.रे.ची रखडपट्टी सुरूच पुन्हा ओव्हरहेड वायर तुटली

By Admin | Updated: June 27, 2015 21:06 IST2015-06-27T11:33:09+5:302015-06-27T21:06:31+5:30

मध्य रेल्वेच्या मस्जिद स्थानकावर लोकलची ओव्हहरहेड वायर तुटल्याने शनिवारी पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

Again, the rolling bar of the M.R. broke the overhead wire | म.रे.ची रखडपट्टी सुरूच पुन्हा ओव्हरहेड वायर तुटली

म.रे.ची रखडपट्टी सुरूच पुन्हा ओव्हरहेड वायर तुटली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २७ - मध्य रेल्वेच्या मस्जिद स्थानकावर लोकलची ओव्हहरहेड वायर तुटल्याने आज पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला मध्य रेल्वेचा खोळंबा आजही कायम राहिल्याने प्रवासी खूप वैतागल्याचे चित्र गाड्यांमध्ये दिसत होते. 

आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मस्जिद स्थानकाजवळ लोकलची ओव्हरहेड वायर तुटल्याने सीएसटीहून कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली.त्या नंतर सीएसटीहून सुटणा-या जलद लोकल धिम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या. दरम्यान या समस्येचा फटका सीएसटीच्या दिशेने जाणा-या जलद मार्गावरील गाड्यांनाही बसला आणि अनेक प्रवासी अडकून पडले. 

घटनेची माहिचती मिळताच रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोचले असून दुरूस्तीचे काम सुरू आहे. 

Web Title: Again, the rolling bar of the M.R. broke the overhead wire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.