शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर पुन्हा कुरघोडी; त्रिशुल, उगवता सूर्य चिन्हाची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 12:41 IST

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा कुरघोडी करत निवडणूक आयोगाकडे पसंतीची ३ चिन्हे पाठवली आहेत. त्यात त्रिशुल, उगवता सूर्य आणि गदा यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरेंनीही त्रिशुल, उगवता सूर्य या चिन्हांची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यामुळे ठाकरे गटाने मागितलेल्या चिन्हांवरच शिंदे गटाने दावा करत निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत. 

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. त्यानंतर आयोगाने शिंदे-ठाकरे गटाला पसंतीची ३ चिन्हे, नावे आयोगाला कळवावं यासाठी मुदत दिली होती. रविवारी शिंदे गटाच्या बैठकीत पक्षाच्या नावाची आणि चिन्हाबाबत चर्चा करण्यात आली. त्याआधीच उद्धव ठाकरे गटाकडून त्रिशुल, उगवता सूर्य आणि मशाल या ३ चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. 

शिंदे गटाच्या बैठकीत सुरुवातीला तलवार, गदा आणि तुतारी या चिन्हावर चर्चा झाली. तुतारी चिन्हाला शिंदे गटाकडून प्राधान्य देण्यात आले. परंतु निवडणूक आयोगाकडे चिन्हाची मागणी करताना शिंदे गटाने त्रिशुल, उगवता सूर्य आणि गदा हे चिन्ह मागण्यात आले आहे. त्यामुळे आता शिंदे-ठाकरे गटाकडून उगवता सूर्य, त्रिशुल या समान चिन्हाची मागणी झाल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग ही दोन्ही नाकारण्याची शक्यता आहे. 

‘मातोश्री’वर खलबतेरविवारी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी आणि  नेत्यांची बैठक पार पडली. यात नवे चिन्ह आणि नावाबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी माहिती देताना सांगितले की, निवडणूक आयोगाने सांगितल्यानुसार आम्ही प्राधान्यक्रमानुसार तीन चिन्हे आणि तीन नावांचा पर्याय सादर केला आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आम्हाला निवडणूक आयोगाकडून त्यापैकी एक चिन्ह आणि एक नाव मिळेल. ठाकरे गटाच्या या निर्णयानंतर ‘आमचं चिन्हं ठरलं’ अशा घोषणा मातोश्रीबाहेर जमलेल्या ठाकरे समर्थकांनी दिल्या.

निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आहेत चिन्हेनिवडणूक आयोगाने शिवसेनेतील उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही, असे सांगितले आहे. दोन्ही गटांना आज संध्याकाळपर्यंत चिन्हांचे तीन पर्याय पसंतीक्रमानुसार वाटप केले जाईल. मात्र सध्या निवडणूक आयोगाकडे १९७ चिन्हे उपलब्ध आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग शिंदे-ठाकरे गटाला कोणतं चिन्ह देतं हे पाहणे गरजेचे आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग