शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
2
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
3
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
4
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
5
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
6
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
7
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
8
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
9
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
10
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
11
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
12
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
13
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
14
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
15
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!
16
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
17
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
18
कमाल! १ मार्काने नापास झाली पण रडत नाही बसली; जिद्दीने अभ्यास करून स्वप्न केलं साकार
19
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर

आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 06:02 IST

राज्यातील १२ पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या

- दीपक भातुसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी तीन वर्ष सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांच्या तसेच स्वतःच्या गृह जिल्ह्यात असलेल्या अधिकाऱ्यांच्या दोन दिवसांत बदल्या करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर राज्य सरकारने अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात केली आहे. मात्र, मुंबईत असलेल्या १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करण्यास गृहविभागाने असमर्थता दर्शवली असून, तसे पत्र आयोगाला दिल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून तसे प्रमाणपत्र मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांमार्फत निवडणूक आयोगाला द्यावे लागते. ऑगस्टमध्ये आयोगाने अशा बदल्यांचे निर्देश देऊनही सरकारने बदल्या केल्या नव्हत्या. शेवटी मुंबईत दौऱ्यावर आलेल्या आयोगाने रविवारी दोन दिवसांत या बदल्या करण्याचे निर्देश सरकारला दिले होते. त्यानुसार सरकारने सोमवारपासून बदल्यांना सुरुवात केली. मंगळवारी राज्यातील १२ उपअधीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

मोठ्या प्रमाणात होणार बदल्यानायब तहसीलदारपर्यंतच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार ‘महसूल’ने विभागीय आयुक्तांना दिले आहेत, तर विविध विभागातील बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. येत्या एक-दोन दिवसांत राज्यात प्रशासन व पोलिस दलात मोठे फेरबदल  झालेले पाहायला मिळतील. 

नकार कशासाठी...?nमुंबईतील बदली पात्र १३० पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्याबाबत गृहविभागाने नकार दिला असून, तसे आयोगाला कळविल्याचे सूत्रांनी सांगितले.nमुंबईत उपनगर आणि शहर असे दोन जिल्हे आहेत; मात्र निवडणूक आयोगाकडून हा एकच जिल्हा गृहीत धरला जातो. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या मुंबईबाहेर नवीन जागी बदल्या केल्या तर मुलांच्या शाळेचा आणि निवासाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. nतसेच या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्यांच्या जागी दुसरे अधिकारी नियुक्त केले तर त्यांनाही ही अडचण येणार आहे. त्यामुळे आम्ही या बदल्या करू शकत नाही, असे गृहविभागाने कळविले आहे.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliceपोलिसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४