शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: शिवसेनेच्या पावलावर मनसेचे पाऊल; मनसैनिकांकडून निष्ठेची शपथपत्रे घेणार? राज ठाकरेंचे आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 16:01 IST

शिवसेनेनंतर आता मनसेनेही पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र घेण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेला मोठीच गळती लागली आहे. यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) एकमागून एक बैठका, सभा, दौरे यावर भर देत पक्ष वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे शिवसेनेने खासदार, आमदार, नगरसेवकांपासून पंचायत समिती सदस्यांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र घेण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाकडूनही तशाच प्रकारचे पत्र घेतले जात आहे. मात्र, अशातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मनसैनिकांकडून निष्ठेचे प्रतिज्ञापत्र घेण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. 

शिवसेनेनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र भरून देण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. चंद्रपुरात मनसैनिकांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र भरून दिले आहे. अशा प्रकारचे शपथपत्र भरून देणारा चंद्रपूर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार शपथपत्र भरून घेण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

राज ठाकरे यांनीच दिले शपथपत्रासंदर्भात आदेश!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे चंद्रपूर दौऱ्यावर होते. यावेळी ते वरोरा येथे आले असता त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी शपथपत्रे भरून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हाच राज यांनी चंद्रपुरातील पदाधिकाऱ्यांना एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रे भरून देण्याचे आदेश दिले होते, असे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, राज्यात शिवसेनेत मोठी बंडाळी झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष धास्तावले आहेत. आपल्याही पक्षात फूट पडण्याची भीती या राजकीय पक्षांना वाटत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसेतही फूट पडू नये यासाठी राज ठाकरे यांनी कंबर कसल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात टीव्ही९ने वृत्त दिले आहे. दरम्यान, मनसेची ही निष्ठेचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्याची मोहीम फक्त चंद्रपुरापुरतीच मर्यादित असेल की राज्याच्या इतर जिल्ह्यातही ही मोहीम राबवली जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेchandrapur-pcचंद्रपूर