शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचे पाच आमदारही नॉट रिचेबल?; एकनाथ शिंदेंच्या धमाक्याचा आवाज दिल्लीपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 16:19 IST

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील आमच्याच आमदारांमध्ये नाराजी असेल तर दुसऱ्यांवर नाराज होण्याचा प्रश्न येत नाही. काहीतरी बिघडलेय, ते आधी पहावे लागेल असे म्हटले होते.

शिवसेनेत बंडाचे वारे सुरु झाल्याने सकाळपासून राज्यातील वातावरण पुरते हादरलेले असताना आता काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी येत आहे. काँग्रेसचे पाच आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. सुरुवातीला विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली होती. यामुळे काँग्रेसने सर्व आमदारांना दिल्लीत बोलविणे पाठविल्याची माहिती मिळत होती. मात्र, अचानक शिवसेनेतील वादळाची बातमी धडकली आणि काँग्रेस मागे पडली होती. 

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील आमच्याच आमदारांमध्ये नाराजी असेल तर दुसऱ्यांवर नाराज होण्याचा प्रश्न येत नाही. काहीतरी बिघडलेय, ते आधी पहावे लागेल असे म्हटले होते. या साऱ्या घडामोडींवर काँग्रेसने आपल्या आमदारांना तातडीने मुंबईला बोलविले आहे. तसेच दिल्लीतून प्रभारी देखील नियुक्त करण्यात आला आहे. 

यातच काँग्रेसचे पाच आमदार नॉट रिचेबल असल्याचे वृत्त होते.  मात्र, काँग्रेसने हे वृत्त फेटाळले आहे. काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात आहेत. काही आमदार नॅाट रिचेबल असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. 

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच मोठ्या बंडाच्या पावित्र्यात असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तीन प्रस्ताव दिले आहेत. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरुन हटविण्यात आले आहे. आता, शिंदेंच्याजागी मुंबईतील शिवसेना आमदाराला संधी देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदे