मोबाईल काढून घेतल्यानंतर पाठविणार प्रश्नपत्रिका

By Admin | Updated: May 16, 2014 04:25 IST2014-05-16T04:25:42+5:302014-05-16T04:25:42+5:30

पुणे विद्यापीठातर्फे महाविद्यालयांना आॅनलाईन पद्धतीने पाठविण्यात आलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी १५ ते २० मिनिटे आगोदर व्हॉटस् अ‍ॅपवरून मिळत असल्याचे समोर आले आहे.

After sending the mobile, question papers will be sent | मोबाईल काढून घेतल्यानंतर पाठविणार प्रश्नपत्रिका

मोबाईल काढून घेतल्यानंतर पाठविणार प्रश्नपत्रिका

पुणे : पुणे विद्यापीठातर्फे महाविद्यालयांना आॅनलाईन पद्धतीने पाठविण्यात आलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी १५ ते २० मिनिटे आगोदर व्हॉटस् अ‍ॅपवरून मिळत असल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाने यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील प्रस्ताव येत्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत (बीओई) ठेवणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी गुरूवारी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात बसविल्यानंतर आणि त्यांच्याकडून मोबाईल काढून घेतल्यानंतर विद्यापीठाने महाविद्यालयांना प्रश्नपत्रिक पाठवाव्यात. या आशयाचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्यानुसार कार्यवाही करण्याचा निर्णय विद्यापीठातर्फे घेण्यात आला आहे. डॉ. गाडे म्हणाले, महाविद्यालयातील व्यक्तींवर विश्वास ठेवून विद्यापीठातर्फे परीक्षेपूवी एक किंवा पाऊण तास आगोदर प्रश्नपत्रिका आॅनलाईन पद्धतीत पाठविल्या जातात. परंतु , त्यामुळे विद्यार्थ्यांना १५ ते २० मिनिटे आगोदर प्रश्नपत्रिका मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी विद्यार्थ्यांचे मोबाईल काढून घावेत, त्यांना परीक्षा केंद्रात बसविल्यानंतरच परीक्षा केंद्रांना प्रश्नपत्रिका पाठवाव्यात. या संदर्भातील प्रस्ताव बीओई समोर ठेवला जाईल. त्यावर चर्चा करून विद्यार्थ्यांना किती तास अगोदर परीक्षा केंद्रांवर बोलवावे याचा निर्णय घेतला जाईल. (प्रतिनिधी)

Web Title: After sending the mobile, question papers will be sent