शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

राऊतांच्या दौऱ्यानंतर पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; ५०० शिवसैनिकांचा 'जय महाराष्ट्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:56 IST

३१ जानेवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुरंदर येथील सभेत काही नगरसेवक देखील प्रवेश करणार आहेत. 

मुंबई/पुणे - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना पक्षांतरं वाढल्याचं दिसून येत आहे. त्यात सर्वात मोठी गळती उद्धव ठाकरे गटाला बसत आहे. ठाकरे गटाला सोडून बहुतांश पदाधिकारी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मुंबईतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली असताना दुसरीकडे पुण्यातही ठाकरे गटाला गळती सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे शाखाप्रमुख, विभागाप्रमुखासह ४००-५०० शिवसैनिक शिंदेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करत आहेत. 

नुकतेच खासदार संजय राऊत यांचा पुणे दौरा झाला. या दौऱ्यात मानापमान नाट्य पाहायला मिळाले. शहरातील पक्ष पदाधिकाऱ्यांकडून संघटनेचा आढावा घेण्यात आला. परंतु त्यानंतर आज ठाकरे गटाला गळती लागली आहे. आज ठाकरे गटातील ४०० ते ५०० कार्यकर्ते शाखाप्रमुख आणि विभाग प्रमुख शिंदे गटात प्रवेश करणार करणार आहेत. मुंबईतील बाळासाहेब भवनात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल. 

शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश होणार असून आज शाखाध्यक्ष आणि विभागप्रमुखांचा पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर ३१ जानेवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुरंदर येथील सभेत काही नगरसेवक देखील प्रवेश करणार आहेत. 

विशेष म्हणजे गेल्या २ महिन्यात संजय राऊत यांचे २ दौरे पुण्यात झाले. या दोन्ही दौऱ्यानंतर ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं चित्र दिसून आले. राऊतांच्या पहिल्या दौऱ्यानंतर पक्षातील ५ माजी नगरसेवकांनी पक्ष सोडला होता. यंदाही पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक पक्ष सोडत आहेत. 

दरम्यान, सोमवारी मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांच्यासह मुंबई, नाशिक, कोल्हापूर सांगली तसेच जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. राजूल पटेल यांच्यासह विले पार्ले येथील शाखाप्रमुख सुनील भागडे, वरळीतील सुरेश कोठेकर आणि रोशन पावसकर यांच्यासह ४० पदाधिकारी आणि ५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी नगर, मानखुर्द येथील कार्यकर्ते तसेच उत्तर मध्य मुंबईमधील अशोक लोखंडे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे