प्रचार कालावधीनंतर राजकीय जाहिराती बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2017 04:01 IST2017-02-14T04:01:20+5:302017-02-14T04:01:20+5:30
मुंबईसह दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांसाठी १४ फेब्रुवारीनंतर कोणत्याही प्रकारच्या जनमत चाचण्या, एक्झिट पोल जाहीर करण्यास

प्रचार कालावधीनंतर राजकीय जाहिराती बंद
मुंबई : मुंबईसह दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांसाठी १४ फेब्रुवारीनंतर कोणत्याही प्रकारच्या जनमत चाचण्या, एक्झिट पोल जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय निवडणूक प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर राजकीय जाहिराती प्रकाशित वा प्रसारित करण्यावरही आयोगाने बंदी घातली आहे.
पहिल्या टप्प्यात १६ तारखेला १५ जिल्हा परिषदा व १६५ पंचायत समित्या, तर दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारीला ११ जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे. याशिवाय दहा महापालिकांच्याही निवडणुका आहेत. या सर्व ठिकाणी जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर, राजकीय पक्ष व उमेदवारांना छापील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांत प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत, तसेच १४ फेब्रुवारीनंतर २१ फेब्रुवारीला मतदानाची वेळ संपेपर्यंत ओपिनियन पोल व एक्झिट पोल चाचण्यांचे निकाल प्रसिद्ध करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे, राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)